माडगी शिवारात टोल नाका उभारणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:26 AM2021-05-29T04:26:44+5:302021-05-29T04:26:44+5:30

तुमसर : मनसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर माडगी शिवारात टोल नाका उभारणीला वेग आला असून येत्या काही दिवसांत येथे टोल नाक्याचे ...

Accelerate the construction of toll gates in Madgi Shivara | माडगी शिवारात टोल नाका उभारणीला वेग

माडगी शिवारात टोल नाका उभारणीला वेग

Next

तुमसर : मनसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर माडगी शिवारात टोल नाका उभारणीला वेग आला असून येत्या काही दिवसांत येथे टोल नाक्याचे काम पूर्ण होणार आहे. नागपूर जिल्ह्यात या महामार्गावर एक टोलनाका उभारला जात आहे. दुसरा टोल नाका तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर माडगी शिवारात उभारला जात आहे. त्यामुळे स्थानिक चारचाकी वाहनधारकांना येथे टोल लागणार काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सुमारे दोन वर्षांपूर्वी मनसर-गोंदिया राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्ता बांधकाम सुरू केले. या रस्त्यावर नागपूर जिल्ह्यात एक टोलनाका उभारला जात असून दुसरा टोलनाका सुमारे ४० ते ४५ किलोमीटर नंतर तुमसर तालुक्यातील माडगी शिवारात उभारणीला वेग आला आहे. माडगी शिवारात करडी, पालोरा, देवाडा व माडगीजवळील पंधरा ते वीस गावांची वाहतूक या राष्ट्रीय महामार्गावरून आहे. त्यामुळे स्थानिक वाहनधारकांना येथे टोल भरावा लागणार काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तुमसर शहराला या टोलनाक्यावरून जावे लागणार आहे. दिवसातून दोन ते तीनवेळा सरासरी ही वाहने तुमसर येथे ये-जा करतील. त्यामुळे एकाच दिवसात दोन ते तीन वेळा टोल भरावा लागणार काय, याची चिंता या वाहनधारकांना सतावत आहे. दुसरा पर्यायी रस्ता माडगी या गावातून जातो. तो रस्ता राष्ट्रीय महामार्ग बंद करणार काय हे सर्व प्रश्न अद्याप गुलदस्त्यात आहेत.

माडगी शिवारातून साकोलीकडे जाणारा रस्ता आहे. त्यामुळे ही सर्व वाहने वाहनांना टोल भरावा लागणार काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्थानिक वाहनधारकांना या टोलनाक्यापासून मुक्ती मिळावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. टोल उभारण्याचा निर्णय हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी येथे दखल घेऊन किमान स्थानिक वाहनधारकांना टोलमुक्तीचा दिलासा देण्याची गरज आहे. जिथे टोल नाका उभारला जात आहे तो रस्ता अरुंद आहे. समोर लहान पूल आहे. त्यामुळे या टोलजवळ वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Accelerate the construction of toll gates in Madgi Shivara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.