तुमसर तालुक्यात धान रोवणीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:23 AM2021-06-27T04:23:23+5:302021-06-27T04:23:23+5:30
तालुक्यातील सिहोरा परिसरात रेंगेपार, सीलेगाव, कर्कापूर, पांजरा, तथा तालुक्यातील अन्य परिसरात धान रोवणीच्या लागवडीच्या कामाला वेग आला आहे. सिंचनाच्या ...
तालुक्यातील सिहोरा परिसरात रेंगेपार, सीलेगाव, कर्कापूर, पांजरा, तथा तालुक्यातील अन्य परिसरात धान रोवणीच्या लागवडीच्या कामाला वेग आला आहे. सिंचनाच्या सोयी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी धान रोवणी सुरू केली आहे. मृगनक्षत्रानंतर तुमसर तालुक्यात पाऊस बरसला. मागील दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी जमा झाले आहे. लहान नाले भरून वाहत आहेत.
शेतकरी सध्या शेतशिवारात शेती कामात व्यस्त असून, शेत-शिवारात शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. सध्या शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करत असून, शेतीची कामे ट्रॅक्टरने करीत आहेत. डिझेलचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट बिघडलेले आहे. बी-बियाणे व खतांचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. अशा परिस्थितीतही बळीराजा कामात व्यस्त आहे.
कोट
तुमसर तालुक्यात धान रोवणीला जोमात सुरुवात झाली; परंतु लहान शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकटामुळे धान रोवणी व इतर शेती काम कसे करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने लहान शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे.
हिरालाल नागपुरे, पंचायत समिती सदस्य, तुमसर.