अन्नदात्यासाठी कृषी समर्पक धोरण स्वीकारा -बंडू बारापात्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 10:51 PM2019-06-29T22:51:28+5:302019-06-29T22:53:05+5:30

भारतासारख्या कृषीप्रधान देशात शेतकरी सिंचनासाठी नेहमी नागवला जातो. हीच बळीराजाच्या आर्थिक स्थैर्यासाठी चिंतेची बाब आहे. जागतिक स्तरावर झेप घेण्यासाठी बळीराजाचे हात बळकट करून त्यांच्या सन्मानाकरिता राज्यासह केंद्र शासनाने कृषी समर्पक धोरण तात्काळ अंगीकारले पाहिजे, असे मत भंडारा येथील बिटीबी सब्जी मंडीचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते बंडू बारापात्रे यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या हितासाठी काय करता येईल, याबाबत त्यांच्याशी साधलेला हा संवाद....

Accept Agriculture Fulfilling Policy for Fooders - Bandu Barapatre | अन्नदात्यासाठी कृषी समर्पक धोरण स्वीकारा -बंडू बारापात्रे

अन्नदात्यासाठी कृषी समर्पक धोरण स्वीकारा -बंडू बारापात्रे

Next
ठळक मुद्देकृषी अर्थव्यवस्थेला बळकटीकरणाची गरजचर्चेतील व्यक्तीशी थेट संवादसंडे स्पेशल मुलाखत

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भारतासारख्या कृषीप्रधान देशात शेतकरी सिंचनासाठी नेहमी नागवला जातो. हीच बळीराजाच्या आर्थिक स्थैर्यासाठी चिंतेची बाब आहे. जागतिक स्तरावर झेप घेण्यासाठी बळीराजाचे हात बळकट करून त्यांच्या सन्मानाकरिता राज्यासह केंद्र शासनाने कृषी समर्पक धोरण तात्काळ अंगीकारले पाहिजे, असे मत भंडारा येथील बिटीबी सब्जी मंडीचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते बंडू बारापात्रे यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या हितासाठी काय करता येईल, याबाबत त्यांच्याशी साधलेला हा संवाद....
सिंचनाबाबत नेमके काय केले पाहिजे?
तत्कालीन प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्वप्नातील नदीजोड प्रकल्पांना इमाने इतबारे राबविण्याची गरज आहे. या प्रकल्पाने मोठ्यांसह लहान प्रकल्पातही पुरेसा जलसाठा उपलब्ध होऊन कालव्यांच्या सहाय्याने व उपवितरीकांच्या मदतीने शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळू शकेल. तसेच बोडी व तलावांचे खोलीकरण करून त्यातील पाणीही उपलब्ध करून दिले जाऊ शकते. शेततळे योजनेलाही प्राधान्य दिले गेले पाहिजे.
स्वामीनाथन आयोगाबाबत आपले मत काय?
सदर आयोग लागू करणे म्हणजे अन्नदात्याला खरा आधार देण्यासारखा आहे. मात्र या आयोगाच्या तरतुदी लागू करण्याबाबत नेहमी राजकारण केले जाते. तरतुदी लागू झाल्यास खऱ्या अर्थाने बळीराजाला बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते. उत्पन्नाच्या आधारावर हमी भाव प्राप्त करून आर्थिक स्थैर्य तो प्राप्त करू शकतो. मागील तीन वर्षांपासून अडीच हजार शेतकऱ्यांना वीज जोडणी निघाली नाही हा प्रश्नही मार्गी निघाला पाहिजे.
विषमुक्त शेतीबाबत मत काय?
आजघडीला शेतजमिनीचा पोत प्रदूषणाने ढासळत चालला आहे. या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन विषमुक्त शेती करिता नैसर्गिक पाणी जमिनीत मुरविणे अत्यंत गरजेचे आहे. सेंद्रीय खतांचा वापरही अगत्याने केला पाहिजे.

जगाला पोसणारा अन्नदाता आत्महत्या करतो, ही बाब शासनाला आत्मचिंतन करण्यासाठी पुरेशी आहे. मात्र त्याकडे शासन, प्रशासन गंभीरतेने बघत नाही. हाडामासाचा जीव रक्ताचे पाणी करत असताना त्यांच्या वेदनांवर आर्थिक फुंकर घालणे महत्वाचे आहे.

शाश्वत सिंचनाकरिता धरणातील पाणी शेतकºयांच्या शेतापर्यंत पोहचेल याची काळजी विद्यमान स्थितीत घेणे अत्यंत महत्वाचे झाले आहे.

Web Title: Accept Agriculture Fulfilling Policy for Fooders - Bandu Barapatre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.