६६३ पैकी ८० बस चालकांकडून अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:38 AM2021-02-05T08:38:39+5:302021-02-05T08:38:39+5:30

भंडारा : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य असणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेसची सेवा आजही सुरक्षित समजली जाते. त्यामुळे अनेक प्रवासी आजही ...

Accidents involving 80 out of 663 bus drivers | ६६३ पैकी ८० बस चालकांकडून अपघात

६६३ पैकी ८० बस चालकांकडून अपघात

Next

भंडारा : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य असणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेसची सेवा आजही सुरक्षित समजली जाते. त्यामुळे अनेक प्रवासी आजही लालपरीलाच आपली पहिली पसंती देतात. यासाठी एसटी महामंडळ विभागातर्फे विना अपघात सेवा निभावणाऱ्या चालकांचा दरवर्षी सत्कारही करण्यात येतो. भंडारा जिल्ह्यात एकूण ६६३ बस चालक कार्यरत आहेत. त्यापैकी ८० बस चालकांकडून अपघात घडले आहेत. राज्यभरात गाव तेथे पोहोचविण्याचा महामंडळाचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. इतकेच नव्हे तर वयोवृद्ध नागरिकांना प्रवासामध्ये सवलत तसेच विद्यार्थिनींना मोफत प्रवास यासोबत प्रवाशांना विविध प्रकारच्या आकर्षक योजनाही एसटी विभागातर्फे राबविल्या जातात. त्यामुळेच बदलत्या काळानुसार एसटीमध्ये एशियाड, शिवशाही अशा नवनवीन सुविधा नियुक्त बसेस दाखल होत आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रतिसादही एसटीला दिवसेंदिवस मिळत आहे. भंडारा विभागात १५ वर्षांपेक्षा जास्त विना अपघात सेवा केलेल्या चालकांची संख्या २१ आहे. तर १० वर्षापेक्षा विना अपघात सेवा निभावलेल्या एका चालकाचा समावेश आहे. याबाबत बोलताना भंडारा विभागीय वाहतूक अधीक्षक प्रवीण घोल्लर यांनी सांगितले की एसटी महामंडळातर्फे विविध प्रकारची चालकांसाठी प्रशिक्षणे राबवली जातात. त्या माध्यमातून त्यांना मानसिक संतुलन तसेच शारीरिक आरोग्य तपासणीसाठी विविध प्रकारची शिबिरे राबवली जातात. अपघात टाळण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात नेहमीच प्रशिक्षणेही आयोजित केली जातात. त्यामुळे विना अपघात बस चालवण्यासाठी चालकांना मोठी मदत होते. राष्ट्रीय महामार्ग असो की ग्रामीण भागातील रस्ते असो एसटी बस चालक डोळ्यात तेल घालून कर्तव्य निभावतात. त्यामुळे आजही ‘एसटीचा प्रवास, सुरक्षित प्रवास’ अशी ओळख आहे.

बॉक्स

७२ स्पीडला होते एसटी लॉक

एसटी महामंडळाच्या बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक वेगाने चालकांकडून कळवल्या जाऊ नयेत, सोबत इंधन बचत व्हावी, चालकाचे बसवरील नियंत्रण कायम राहावे या सर्व गोष्टींचा विचार करून एसटी बसेसना वेगमर्यादा घालून देण्यात आली आहे. त्यामध्ये कमी अंतराच्या बसेसना ६० किमी प्रति तास, तर लांब पल्ल्याच्या बसेसना ७२ किमी प्रति तास अशी वेगमर्यादा ठेवली जात असल्याचे विभागीय वाहतूक अधिकारी चंद्रकांत वडस्कर यांनी सांगितले.

कोट

विना अपघात सेवा देणाऱ्या चालकांना जिल्हास्तरावर बॅच बिल्ला देऊन सत्कार केला जातो. स्वातंत्र्य दिन, कामगार दिनानिमित्ताने गौरव करण्यात येतो; मात्र कोरोनामुळे यात खंड पडला होता. आता पुन्हा नव्याने ही योजना सुरू केली आहे.

चंद्रकांत वडस्कर,

विभागीय वाहतूक अधिकारी, भंडारा.

कोट

चालकाची एसटी महामंडळात नियुक्ती झाल्यानंतर एसटी विभागाच्यावतीने वाहन चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. प्रवासी वाहतूक करीत असल्याने त्यांना प्रवाशांची बोलण्याची पद्धत तसेच इतरही मार्गदर्शन वरिष्ठांकडून करण्यात येते.

प्रवीण घोल्लर,

विभागीय वाहतूक अधीक्षक, भंडारा

बॉक्स

वर्षभरात ८० अपघात भंडारा

भंडारा विभागात २०२० साली वर्षभरात ८० अपघात घडले आहेत. यामध्ये रस्त्यांची असलेली दुरवस्था असल्यामुळे अनेक ठिकाणी अपघात झाले. काही ठिकाणी अचानक रस्त्यांवर येणारे प्राणी तसेच अन्य छोट्या-मोठ्या कारणास्तव अपघात घडले. त्यामुळे एसटी विभागातर्फे चालकांना सातत्याने प्रशिक्षणावर भर दिला जात आहे.

कोट चालक

माझ्या दहा वर्षांच्या सेवेत आतापर्यंत एकही अपघात माझ्या हातून घडला नाही. प्रवाशांच्या सुरक्षेला प्रथम महत्त्व दिल्याने कर्तव्यावर असताना प्रवासी वाहतुकीचे भान कायम ठेवून कर्तव्य निभावण्याची आजपर्यंत सुदैवाने कोणताही अपघात घडला नाही.

प्रणव रायपूरकर,

एसटी चालक, भंडारा आगार

Web Title: Accidents involving 80 out of 663 bus drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.