लेखामेंढा, पाचगाव यांनी ग्रामस्वराज्याचे स्वप्न साकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 11:16 PM2018-11-30T23:16:10+5:302018-11-30T23:16:40+5:30

भारतात आपापल्या सोयीकरिता तथाकथित गांधीभक्त गांधीजींच्या स्वप्नांच्या चुराडा करतांना दिसत असतांना लेखामेंढा आणि पाचगाव यांनी गांधीजींचे ग्राम-स्वराज्याचे स्वप्न पूर्ण केले. गांधी विचारांवर चालणे कठीण असले तरी अशक्य नाही.

Accountantha, Pachgaon became the dream of Gram Swaroop | लेखामेंढा, पाचगाव यांनी ग्रामस्वराज्याचे स्वप्न साकारले

लेखामेंढा, पाचगाव यांनी ग्रामस्वराज्याचे स्वप्न साकारले

Next
ठळक मुद्देमधुकर निसळ : कोका येथील ‘गांधी जीवन व विचार’ शिबिराचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भारतात आपापल्या सोयीकरिता तथाकथित गांधीभक्त गांधीजींच्या स्वप्नांच्या चुराडा करतांना दिसत असतांना लेखामेंढा आणि पाचगाव यांनी गांधीजींचे ग्राम-स्वराज्याचे स्वप्न पूर्ण केले. गांधी विचारांवर चालणे कठीण असले तरी अशक्य नाही. शिबिरात 'विश्वास' म्हणजे गांधी 'निर्भयता' म्हणजे गांधी हे परवलीचे शब्दप्रयोग चर्चिल्या गेले. शिबिरार्थ्यांना गांधी मार्गावर चालण्याकरिता , तुमचे पहिले पाऊल मोलाचे ठरेल. गांधी होता येणार नाही, परंतु एक उत्तम नागरिक बनता येईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ सर्वोदयी विचारवंत मधुकर निसळ यांनी केले.
कोका(जंगल) येथील 'गांधी जीवन व विचार 'शिबिराच्या समारोपप्रसंगी 'समग्र गांधी ' या विषयावर ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिबिरप्रमुख प्रा. वामन तुरिले होते. मधुकर निसळ म्हणाले, गांधी ७९ वर्षांर्च व्रतस्थ जीवन जगले. त्यांच्या अहिंसात्मक प्रतिकाराचा विजय केवळ भारताकरिता नाही, तर विश्वाकरिता असामान्य ठरला. आज जगातील बिकट समस्यांवर गांधी विचारच तोडगा वाटतो आहे. भ्रष्टाचारमुक्त भारत गांधींचे स्वप्न होते. युवकांनी निर्धार केला तर गांधीजींच्या स्वप्नांचा भारत बनू शकेल. प्रा. वामन तुरिले यांनी महात्मा गांधी यांच्या २ फेब्रुवारी १९२७ आणि १० नोव्हेंबर १९३३ च्या भंडारा दौऱ्याची व त्याप्रसंगी घडलेल्या विशेष घटनांची माहिती दिली. भंडारा जिल्ह्यातील स्वातंत्र्य चळवळीबद्दलही ते बोलले. आभार शिबिर सहप्रमुख महेश रणदिवे यांनी मानले.
समारोप कार्यक्रमाचा प्रारंभ कवयित्री स्मिता गालफाडे यांनी स्वरबद्ध केलेल्या 'गांधीवाणी-गांधीवाणी ' या समूहगीतांनी झाला. सकाळच्या पहिल्या सत्रात डॉ. नितीन तुरस्कर यांनी 'कॅन्सर' आजाराविषयी माहिती दिली. प्रा. डॉ . दीपा भुरे -हटवार यांनी 'स्वेच्छा दारिद्र्य ' या विषयावर तर प्रा. डॉ . वंदना मोटघरे यांनी 'गांधीजींच्या कल्पनेतील भ्रष्टाचारमुक्त भारत' या विषयावर भाषण देत चर्चा घडवून आणली. अध्यक्षस्थानी शिबिर सहप्रमुख रामबिलास सारडा होते. ज्येष्ठ सर्वोदयी विचारवंत टी. आर. के. सोमैया यांच्या मार्गदर्शनाखाली २००४ मध्ये झालेल्या कोका येथील शिबिरातील विद्यार्थी-विद्यार्थिनी शिल्पा नाकतोडे, लखन चौरे, प्रिया क्षीरसागर, प्यारेलाल वाघमारे, विलास केझरकर यांनी जुन्या आठवणी आणि सोमैया यांचा त्यांच्यावरील प्रभाव यांचे वर्णन केले. यावेळी निळकंठ रणदिवे, डॉ. हेमंत चंदवासकर, शुभम साठवणे, आशिष भोंगाडे, निमिष माटे, सचिन कुंभरे प्रमाुख्याने उपस्थित होते. गीत गुंजनकर, चाहूल नागपुरे, अमन अतकरी, विनय मते, नीरज राजभोज यांच्या सहकार्याने शिबिरार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
शिबिरात रोगनिदान
पतंजली हरिद्वार द्वारा प्रशिक्षित डॉ. दीप्ती बोहरे यांनी कोका व कोका परिसरातील अनेक रुग्णांना लाभ दिला. तसेच नॅशनल कॅन्सर इन्स्टिटयूट, नागपूर द्वारा शिबिरात आयोजित 'कर्करोगनिदान शिबिरात' उपस्थित रुग्णात कॅन्सरचा शोध डॉ. सुनीता सावनकर, डॉ. के. स्वामिनाथन, दीपक पेठे यांनी सहभाग घेतला. सर्व शिबिरार्थ्यांना 'गांधी गंगा' तसेच 'सात्विक जीवन पद्धती' आणि 'दीर्घायुष्य', ही पुस्तके भेट म्हणून देण्यात आली.

Web Title: Accountantha, Pachgaon became the dream of Gram Swaroop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.