वाटमारीच्या प्रयत्नातील सराईत आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 12:10 AM2017-11-19T00:10:27+5:302017-11-19T00:10:47+5:30
राष्ट्रीय महामार्गावरील अंधाराचा फायदा घेत वाटमारीच्या प्रयत्नात असलेल्या दोघांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुस्क्या आवडल्या.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : राष्ट्रीय महामार्गावरील अंधाराचा फायदा घेत वाटमारीच्या प्रयत्नात असलेल्या दोघांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुस्क्या आवडल्या. यात आरोपींचा एक साथीदार पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. ही कारवाई शुक्रवारच्या रात्री भिलेवाडा ते शिंगोरी दरम्यान केली.
दिनेश प्रकाश कुर्वे सोनी (२४) रा. बडा हनुमान मंदिर गोंंदिया, सुरज शिवकुमार तिवारी (२८) रा. रेल्वेस्टेशन गांधी नगर अमरावती असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांचे नाव आहे. या कारवाईदरम्यान गुन्हेगारांचा एक साथीदार पसार झाला आहे. राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा ते लाखनी मार्गावर असलेल्या भिलेवाडा ते सिंगोरी दरम्यान एका लाल रंगाची दुचाकी रस्त्याच्या कडेलगत थांबून तीन युवक संशयास्पद स्थितीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांना प्राप्त झाली. या माहितीवरून त्यांनी पथकासह राष्ट्रीय महामार्ग गाठला. यावेळी सदर इसम साकोलीकडून येणाºया वाहनांना हात दाखविताना दिसून आले. त्यामुळे या युवकांना पकडण्याचा प्रयत्न केला असता दिनेश कुर्वे सोनी व सुरज तिवारी यांना अटक केली तर अन्य एक साथीदार पसार झाला. या दोघांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून लुटमारीसाठी वापरण्यात येणाºया धारदार साहित्य सापडून आले. या कारवाईत पोलीसांनी एमएच ३५ एम ६३७६ या दुचाकीसह अन्य साहित्य जप्त केले आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश काळे, विनोद रहांगडाले, प्रितीलाल रहांगडाले, बंडू नंदनवार, मंगल कुथे, वामन ठाकरे, रोशन गजभिये, दिनेश आंबेडारे, मोहरकर, स्रेहल गजभिये, चालक हरीदास रामटेके यांनी केली.