आरोपी दाम्पत्याला अटक

By Admin | Published: April 3, 2016 03:49 AM2016-04-03T03:49:43+5:302016-04-03T03:49:43+5:30

तालुक्यातील किन्ही मोखे येथील निपेश रामटेके खून प्रकरणात एका दाम्पत्याला साकोली पोलिसांनी अटक केली आहे.

The accused arrested the couple | आरोपी दाम्पत्याला अटक

आरोपी दाम्पत्याला अटक

googlenewsNext

निपेश रामटेके खून प्रकरण : मृतदेहासाठी करावी लागणार प्रतीक्षा
साकोली : तालुक्यातील किन्ही मोखे येथील निपेश रामटेके खून प्रकरणात एका दाम्पत्याला साकोली पोलिसांनी अटक केली आहे. अन्य चार जणांची चौकशी सुरू असून या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेशन विभाग करीत हो. या खूनात वापरण्यात आलेले वाहन व खूनाचे कारण कळू शकले नाही.
स्थानिक गुन्हे शाखेने शैलेश राधेश्याम गणवीर (३५) व त्याची पत्नी अस्मिता शैलेश गणवीर (२५) रा.किन्ही (मोखे) या दोघांना अटक केली असून संगनमत करून खून करणे व पुरावे नष्ट करणे या आरोपाखाली भादंवि ३०२, २०१ (३४) कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने राधेशाम गंभीर गणवीर (६०), जगदीश राधेशाम गणवीर (४५) वामन गंभीर गणवीर (५२) दिलीप महारू उंदीरवाडे (४८) रा.किन्ही (मोखे) यांना ताब्यात घेतले असून त्यांची भंडारा येथे चौकशी सुरू आहे.
निपेश रामटेके हा १९ मार्चच्या रात्रीपासून घरून बेपत्ता होता. तब्बल १८ दिवसानंतर म्हणजे १ एप्रिलला त्याचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत एका प्लॉस्टिकच्या पोत्यात बांधलेल्या अवस्थेत मिळाला. कपडे, हातातील कडा व आंगठीवरून ओळख पटली. ओळख पटताच पोलिसांनी काल दुपारी सहा संशयितांना ताब्यात घेतले. या खून प्रकरणात घटनास्थळ असलेल्या चारगाव जंगल शिवारातच वातावरण तापल्याने रामटेके कुटूंबिय व गावकऱ्यांच्या मागणीवरून पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांचे भंडारा कंट्रोल रूममध्ये स्थानांतरण करण्यात आले परिस्थिती बिघडून नये यासाठी सहाही संशयीतांना स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाच्या स्वाधीन करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)

घरीच घडले हत्याकांड
पोलीस सुत्रानुसार, निपेशला घरी बोलावून काठीने मारहाण करून ठार मारण्यात आले. त्यानंतर मृतदेह चारगाव जंगलात फेकण्यात आला. मात्र याप्रकरणात नेमके किती जण होते, याची चौकशी सुरू आहे.
वाहनाचा शोध नाही
निपेशचा खून करून मृतदेह एखाद्या वाहनाने चारगाव जंगलात फेकण्यात आला. मात्र ते वाहन कोणते होते याचा शोध लागला नसून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस तपास करीत आहेत.
नवे ठाणेदार राऊत रूजु
या खून प्रकरणात तत्कालीन ठाणेदार सुरेश घुसर यांचे तडकाफडकी स्थानांतरण झाले. त्यांच्याठिकाणी नवे ठाणेदार म्हणून जी.डी. राऊत हे शनिवारला रूजू झाले. त्यामुळे निपेश खून प्रकरणातील आरोपींना शोधण्याचे आव्हान नवे ठाणेदार राऊत यांच्यावर आले आहे.

Web Title: The accused arrested the couple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.