अत्याचारप्रकरणी आरोपीला सात वर्षे सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 10:36 PM2018-06-06T22:36:36+5:302018-06-06T22:36:49+5:30

शिवणीबांध येथे तीन वर्षापूर्वी घरी स्वयंपाक करीत असलेल्या महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने सात वर्ष सश्रम कारवास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. राधेश्याम शहारे (२५) रा.शिवणीबांध असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे.

The accused has been sentenced to seven years rigorous imprisonment for torture | अत्याचारप्रकरणी आरोपीला सात वर्षे सश्रम कारावास

अत्याचारप्रकरणी आरोपीला सात वर्षे सश्रम कारावास

Next
ठळक मुद्देजिल्हा न्यायालयाचा निर्णय : शिवणीबांध येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा/साकोली : शिवणीबांध येथे तीन वर्षापूर्वी घरी स्वयंपाक करीत असलेल्या महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने सात वर्ष सश्रम कारवास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. राधेश्याम शहारे (२५) रा.शिवणीबांध असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे.
शिवणीबांध येथील पीडित महिला १५ जून २०१५ ला सकाळी मजुरीने कामावर जावून दुपारी घरी आली. यावेळी राधेश्याम शहारे याने तुमचा मुलगा घरी आहे का? असे विचारून निघून गेला. सायंकाळी ६ वाजता पीडित महिला स्वयंपाक करीत असताना राधेश्यामने तिच्या घरात प्रवेश करून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पती घरी आल्यानंतर घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी साकोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.
पीडित महिलेच्या तक्रारीवरून भादंवि ३७६ (१) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी तपास अधिकारी दिलीप कुंदोजवार यांनी राधेश्याम शहारेला अटक केली. त्यानंतर आरोपीविरुद्ध पुरावे मिळाल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सचिन भन्साली यांनी न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद एैकून ५ जून रोजी गुन्ह्याचे स्वरुप व गांभीर्य लक्षात घेऊन राधेश्याम शहारे ७ वर्ष सश्रम कारवास व २ हजार रूपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने कारवासाची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणात सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड.विश्वास तवले यांनी काम पाहिले.

विनयभंग प्रकरणात अडीच वर्षाची शिक्षा
मोहाडी : महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी मोहाडी न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.के. साबळे यांनी आरोपी सुमेरसिंग सुखलाल गयगये (४२) रा.खमारी (बुज) याला अडीच वर्षाचा कारावास तसेच पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. २०१५ मध्ये खमारी येथील सुमेरसिंग गयगये याने एका महिलेच्या घरात प्रवेश करून तिचा विनयभंग केला होता. या प्रकरणात मोहाडी पोलिसांनी भादंवि ३५४ (अ), (ब), (ड), ४५२, ५०९ कलमान्वये गुन्हा नोंदविला होता. ठाणेदार जोतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शन हवालदार चोपराम निर्गुळे, सुनिल कासदा यांनी तपास करून मोहाडी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायाधिशांनी दोन्ही बाजू ऐकून साक्ष व पुराव्याच्या आधारे आरोपींला कलम ३५४ (अ) नुसार एक वर्ष शिक्षा व दोन लाख रुपये दंड, कलम ३५४ (ड) नुसार एक वर्षाची शिक्षा व दोन हजार रुपये दंड, कलम ४४८ नुसार सहा महिने शिक्षा व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. शासनाच्यावतीने सरकारी अभियोक्ता विपुल कोकाटे यांनी बाजू मांडली तर हवालदार नामदेव धांडे यांनी पैरवी केली.

Web Title: The accused has been sentenced to seven years rigorous imprisonment for torture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.