विनयभंगप्रकरणातील आरोपीस अखेर अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:33 AM2021-02-14T04:33:07+5:302021-02-14T04:33:07+5:30
ज्ञानेश्वर ऊर्फ नाना पवनकर (५० वर्षे ) रा. विरली (बु.) असे अरोपीचे नाव आहे. दोन बालिका घराच्या परिसरात खेळत ...
ज्ञानेश्वर ऊर्फ नाना पवनकर (५० वर्षे ) रा. विरली (बु.) असे अरोपीचे नाव आहे. दोन बालिका घराच्या परिसरात खेळत होत्या. यावेळी आरोपीने दोन्ही बालिकांना जवळ बोलाविले आणि बालिकांचा विनयभंग केला. घाबरलेल्या दोन्ही बालिकांनी घटनास्थळावरून पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेची माहिती पीडितांनी रात्री कुटुंबातील आई-वडिलांना दिल्याने पुढील दिवशी १० फेब्रुवारी रोजी सदर घटनेची लाखांदूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीवरून पोलिसांनी विनयभंग व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलीस कारवाईचा सुगावा लागताच आरोपी पसार झाला. मात्र, शुक्रवारी तो गावात आल्याचा सुगावा लागताच लाखांदूर पोलिसांनी त्याला तातडीने अटक केली. ठाणेदार मनोहर कोरेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप तारामंडल, सहायक फौजदार रवींद्र मडावी, अंमलदार मनीष चव्हाण यांनी कारवाई केली.