४०० ब्रास रेती चोरीतील आरोपी अद्यापही मोकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2022 05:00 AM2022-03-09T05:00:00+5:302022-03-09T05:00:53+5:30
पांजरा गावाजवळून वैनगंगा नदी वाहते. वैनगंगेचे विस्तीर्ण पात्र असून उच्च दर्जाची रेती आहे. तस्करांनी नदीपात्रातून रेतीचे उत्खनन करून नदीकाठावर साठा केला हाता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महसूल प्रशासनाने ४०० ब्रास रेती जप्त केली. स्थानिक महसूल कर्मचाऱ्यांना रेतीच्या देखरेखीसाठी नियुक्त केले होते. त्यानंतरही ४०० ब्रास रेती चोरीला गेली. या प्रकरणाची तहसीलदारांनी सिहोरा ठाण्यात तक्रार दाखल केली. आता यालाही दीड महिना झाला. परंतु या प्रकरणातील आरोपींचा सुगावा लागला नाही.
लाेकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तालुक्यातील पांजरा रेतीघाटातून सुमारे ४०० ब्रास रेती चोरी झाली होती. सुमारे दीड महिन्यापूर्वी तुमसर तहसीलदारांनी सिहोरा ठाण्यात तक्रार दिली. मात्र अद्यापही आरोपींचा सुगावा लागला नाही. थोडीथोडकी नव्हे तर तब्बल ४०० ब्रास रेती चोरी होईपर्यंत कुणाच्याच लक्षात आले नाही काय, असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे.
पांजरा गावाजवळून वैनगंगा नदी वाहते. वैनगंगेचे विस्तीर्ण पात्र असून उच्च दर्जाची रेती आहे. तस्करांनी नदीपात्रातून रेतीचे उत्खनन करून नदीकाठावर साठा केला हाता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महसूल प्रशासनाने ४०० ब्रास रेती जप्त केली. स्थानिक महसूल कर्मचाऱ्यांना रेतीच्या देखरेखीसाठी नियुक्त केले होते. त्यानंतरही ४०० ब्रास रेती चोरीला गेली. या प्रकरणाची तहसीलदारांनी सिहोरा ठाण्यात तक्रार दाखल केली. आता यालाही दीड महिना झाला. परंतु या प्रकरणातील आरोपींचा सुगावा लागला नाही.
पांजरा येथील रेती चोरीची तक्रार प्राप्त झाली. त्या अनुषंगाने चौकशी सुरू असून साक्षी, पुरावे नोंदी इत्यादी नियमानुसार करण्यात येत आहे. रेती चोरटे लवकरच गजाआड होतील.
- नारायण तुरकुंडे,
सहायक पोलीस निरीक्षक, सिहोरा