दहा हजार लसीकरणाचे लक्ष्य साध्य करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:33 AM2021-03-24T04:33:44+5:302021-03-24T04:33:44+5:30

कोविड लसीकरण कृती दलाची मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, ...

Achieve the target of ten thousand vaccinations | दहा हजार लसीकरणाचे लक्ष्य साध्य करा

दहा हजार लसीकरणाचे लक्ष्य साध्य करा

Next

कोविड लसीकरण कृती दलाची मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पानझाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. फारुकी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, डॉ. माधुरी माथूरकर व कृती दलाचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

कोविड या संसर्गजन्य आजारावर लस हाच योग्य पर्याय असून, पात्र लाभार्थींनी मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी केंद्रावर यावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. लस घेतल्यानंतर कोरोनाचा धोका कमी होतो. विशेष म्हणजे लस घेतल्यानंतर कोरोनाचा गंभीर धोका टाळता येतो. रुग्णाला आयसीयूमध्ये दाखल करण्यापासून ही लस दूर ठेवते.

जिल्हात आरोग्य विभागाच्या वतीने प्रतिदिन ८ हजार ९०० व्यक्तींचे लसीकरण करण्यात येते. लसीकरणाचा वेग वाढवून दर दिवशी दहा हजार लसीचे उद्दिष्ट साध्य करा, अशा सूचना त्यांनी आरोग्य विभागाला दिल्या. सध्या जिल्ह्यात लस उपलब्ध असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्कर मिळून भंडारा जिल्ह्यात १९ हजार १५४ लाभार्थींची नोंदणी झाली आहे. यात १०५९५ आरोग्य कर्मचारी व ८५५९ फ्रंटलाइन वर्करचा समावेश आहे. जिल्हा रुग्णालय भंडारा, उपजिल्हा रुग्णालय तुमसर, उपजिल्हा रुग्णालय साकोली, ग्रामीण रुग्णालय लाखनी, ग्रामीण रुग्णालय पवनी, ग्रामीण रुग्णालय मोहाडी, व ग्रामीण रुग्णालय लाखांदूर, ग्रामीण रुग्णालय पालांदूर, ऑर्डन्स फॅक्टरी, ग्रामीण रुग्णालय अड्याळ, ग्रामीण रुग्णालय सिहोरा, प्राथमिक आरोग्य केंद्र व प्रायव्हेट हॉस्पिटल येथे लसीकरण केंद्र आहेत. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार लसीकरण केंद्र वाढविण्यासाठी आरोग्य विभाग नियोजन करत आहे.

नियमित कोविड लसीकरणांतर्गत आतापर्यंत ८ हजार ७२२ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला असून, दुसरा डोस घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ६ हजार ५० एवढी आहे, तर ५ हजार २५१ फ्रंटलाइन वर्कर्सनी कोविड लसीचा पहिला डोस घेतला आहे. दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या १ हजार ७५१ एवढी आहे.

Web Title: Achieve the target of ten thousand vaccinations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.