२५ कृषी सेवा केंद्रांवर कारवाई
By Admin | Published: July 18, 2015 12:33 AM2015-07-18T00:33:24+5:302015-07-18T00:33:24+5:30
खरीप हंगामात बियाणे आणि खते यांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी भरारी पथकाद्वारे तसेच पंचायत समिती स्तरावरुन कृषि सेवा केंद्राची तपासणी करण्यात आली,
भंडारा : खरीप हंगामात बियाणे आणि खते यांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी भरारी पथकाद्वारे तसेच पंचायत समिती स्तरावरुन कृषि सेवा केंद्राची तपासणी करण्यात आली, यामध्ये २५ कृषी सेवा केंद्रांना विक्रीबंद आदेश देण्यात आले आहेत.
यामध्ये तुमसर येथील नवदुर्गा कृषी सेवा केंद्र, वैष्णवी कृषी सेवा केंद्र, हिरा कृषी सेवा केंद्र, नागपुरे कृषी सेवा केंद्र, भंडारा येथील अॅग्रो केअर, नयन कृषी केंद्र व पालांदूर येथील गायत्री कृषी सेवा केंद्र यांचा प्रामुख्याने समावेश आहे. सदर कार्यवाही कृषी विकास अधिकारी एस. एस. किरवे तसेच भरारी पथक पंचायत समिती यांच्या मार्गदर्शनात कृषी अधिकाऱ्यांनी केली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कृषी केंद्र संचालकांकडून आर्थिक पिळवणूक होत असल्यास शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्र संचालकांची तक्रार कृषी विभागाला करावी, असे आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)