गुडमॉर्निग पथकाकडून उघड्यावर शौचास जाणाऱ्या  २८ व्यक्तीविरुद्ध कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 01:12 PM2017-12-29T13:12:40+5:302017-12-29T13:22:10+5:30

पिंपळगाव राजा : पंचायत समिती खामगाव अंतर्गत कार्यरत असलेल्या गुडमॉर्निंग पथकाने तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील उघड्यावर शौचास जाणाऱ्या  २८ व्यक्तींविरुद्ध शुक्रवारी सकाळी कारवाई केली. 

Action against 28 people who were beaten to death by a Goodmaning squad |  गुडमॉर्निग पथकाकडून उघड्यावर शौचास जाणाऱ्या  २८ व्यक्तीविरुद्ध कारवाई 

 गुडमॉर्निग पथकाकडून उघड्यावर शौचास जाणाऱ्या  २८ व्यक्तीविरुद्ध कारवाई 

googlenewsNext
ठळक मुद्दे पिंपळगाव राजा येथील उघड्यावर शौचास जाणाऱ्या २८ नागरिकांना पकडून त्यांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले.गटविकास अधिकारी किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनात गुड मॉर्निंग पथकाने शुक्रवारी खामगाव तालुक्यात विविध ठिकाणी भेटी दिल्या. शुक्रवारच्या कारवाईने पुन्हा एकदा वचक निर्माण होण्यात मदत झाली आहे.

पिंपळगाव राजा : पंचायत समिती खामगाव अंतर्गत कार्यरत असलेल्या गुडमॉर्निंग पथकाने तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील उघड्यावर शौचास जाणाऱ्या २८ व्यक्तींविरुद्ध शुक्रवारी सकाळी कारवाई केली. 
गटविकास अधिकारी किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनात गुड मॉर्निंग पथकाने शुक्रवारी खामगाव तालुक्यात विविध ठिकाणी भेटी दिल्या. यामध्ये पिंपळगाव राजा येथे ५.३० ते ७ वाजेदरम्यान पथक ठाण मांडून होते. याठिकाणी उघड्यावर शौचास जाणाऱ्या २८ नागरिकांना पकडून त्यांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले. याठिकाणी त्यांना समज देवून दंडात्मक कारवाई केली. काही दिवसापूर्वी घानेगाव, ज्ञानगंगापूर, राहूड, ढोरपगाव, कालेगाव, कुंबेफळ आदी गावात अनेक टमरेल बहाद्दरावर कारवाई केली होती. त्यामुळे उघड्यावर शौचास बसणे बंद झाले होते. शुक्रवारच्या कारवाईने पुन्हा एकदा वचक निर्माण होण्यात मदत झाली आहे.

Web Title: Action against 28 people who were beaten to death by a Goodmaning squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.