पालांदूर येथे मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:06 AM2021-03-04T05:06:41+5:302021-03-04T05:06:41+5:30
मास्क वापर अत्यंत महत्त्वाचा असून, प्राथमिक उपाययोजनेत सुचविलेल्या उपायांत मास्कला अधिक महत्त्व सांगण्यात आलेले आहे. दुचाकी, चारचाकी वाहनांवर नियमापेक्षा ...
मास्क वापर अत्यंत महत्त्वाचा असून, प्राथमिक उपाययोजनेत सुचविलेल्या उपायांत मास्कला अधिक महत्त्व सांगण्यात आलेले आहे.
दुचाकी, चारचाकी वाहनांवर नियमापेक्षा अधिक असणाऱ्या नागरिकांवरसुद्धा दंडात्मक कारवाई सुरू केलेली आहे. या कारवाईचे पडसाद गावात व परिसरात पसरले. गावकऱ्यांनीसुद्धा प्रशासनाच्या कार्याचे कौतुक केले. जागरूक नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करीत मास्कचा वापर वाढविलेला आहे.
दंडात्मक कारवाईत सरपंच पंकज रामटेके, ठाणेदार मनोज सिडाम, ठाणेदार मनोज वनवेे, मंडळ अधिकारी राकेश पंधरे, तलाठी सुनील कासराळे, पोलीस पाटील रमेश कापसे, तंटामुक्त समिती अध्यक्ष पुरुषोत्तम भुसारी, पोहवा कचरू शेंडे, श्यामराव चाचेरे, पोलीस शिपाई नावेद पठाण, पोलीस नायक अरुणा वासनिक, तलाठी खेमराज मेश्राम कोलारी यांचा समावेश होता.
व्यापारी, ग्राहक, नागरिक यांनी मास्कशिवाय घराबाहेर पडू नये. व्यापाऱ्यांनी विनामास्क ग्राहकांना दुकानातील सामान देऊ नये. मास्कचा वापर अत्यंत महत्त्वाचा असल्याने प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी सांभाळत मास्क वापरायलाच पाहिजेे, असे पोलीस निरीक्षक मनोज सिडाम यांनी सांगितले.