बोगस डॉक्टरांवर होणार कारवाई

By Admin | Published: March 17, 2017 12:27 AM2017-03-17T00:27:54+5:302017-03-17T00:27:54+5:30

राज्यात प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक (पीसीपीएनडीटी) कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आरोग्य, महसूल, पोलीस, अन्न व औषध

Action on bogus doctors | बोगस डॉक्टरांवर होणार कारवाई

बोगस डॉक्टरांवर होणार कारवाई

googlenewsNext

समिती स्थापन : अधिकाऱ्यांचे पथक करणार रूग्णालयांची तपासणी
भंडारा : राज्यात प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक (पीसीपीएनडीटी) कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आरोग्य, महसूल, पोलीस, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकामार्फत रूग्णालयांची तपासणी करण्याचे निर्देश आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिले आहेत. त्यानुसार १५ मार्च ते १५ एप्रिल या कालावधीत जिल्ह्यातील सर्वच रूग्णालयात तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली.
सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथे गर्भपातादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्र्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, आरोग्य अधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फन्सिंगद्वारे संवाद साधून पीसीपीएनडीटी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत सूचना दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत दवाखाने, डॉक्टर्स, गर्भपात केंद्राची आरोग्य विभागामार्फत तपासणी करण्यात येते. मात्र अनधिकृत डॉक्टर आणि नोंदणीकृत नसलेल्या रूग्णालयांमध्ये अवैधरित्या गर्भलिंग निदान करून स्त्रीभ्रुण हत्या झाल्याचे निदर्शनास येत आहे. अशा प्रकारांना आळा बसावा, यासाठी धडक मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहीमेत आरोग्य, महसूल, पोलीस, अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकारी राहणार असून त्यांचे पथक तयार करण्यात येईल. या पथकाकडून जिल्ह्यातील रूग्णालय तपासणीची संयुक्त मोहीम राबविण्यात येणार आहे. तालुकास्तरावरही समिती गठीत करण्यात येणार असून आरोग्य केंद्र स्तरावर स्वतंत्र पथक स्थापन करण्यात येणार आहे. या पथकाने केलेल्या कारवाईचा अहवाल जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या समितीकडे सादर करण्यात येईल. त्यानंतर कायदेशीर कार्यवाही करेल.
या मोहिमेत पी.सी.पी.एन. डी.टी. कायदा, एम.पी.टी. कायदा आदींची अंमलबजावणी योग्य प्रकारे होते की नाही. रेकॉर्ड व्यवस्थित ठेवला जातो की नाही याबाबत तपासणी केली जाणार आहे. यासाठी तालुका स्तरावर समिती गठित करण्यात येणार असून तपासणीदरम्यान काही आक्षेपार्ह आढळल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांमार्फत कार्यवाही करण्यात येईल. दरम्यान प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या डॉक्टर्स किंवा रूग्णालयास त्रास होणार नाही , याची खबरदारी घेण्यात येईल, असेही सांगितले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवीशेखर धकाते यांच्यासह शासकीय व खासगी रूग्णालयाचे डॉक्टर्स उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Action on bogus doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.