ग्रामस्तरावरील कोरोना दक्षता समित्यांची कारवाई शन्यच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:35 AM2021-05-14T04:35:05+5:302021-05-14T04:35:05+5:30

ग्रामीण भागातील ग्रामस्तरीय कोरोना दक्षता समितीपुढे कारवाई कशी करावी, असा मोठा प्रश्‍न आहे. गावात एखादा कोरोना पॉझिटिव्ह अथवा त्याचे ...

Action of Corona Vigilance Committees at village level is impossible | ग्रामस्तरावरील कोरोना दक्षता समित्यांची कारवाई शन्यच

ग्रामस्तरावरील कोरोना दक्षता समित्यांची कारवाई शन्यच

Next

ग्रामीण भागातील ग्रामस्तरीय कोरोना दक्षता समितीपुढे कारवाई कशी करावी, असा मोठा प्रश्‍न आहे. गावात एखादा कोरोना पॉझिटिव्ह अथवा त्याचे नातेवाईक बाहेर फिरत असल्यास त्याच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. मात्र, कोणीही दुश्मनी घेण्यास तयार नाही. गावातील राजकारण व प्रत्यक्ष ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी सोबत नसल्याने आपण कोणा कोणाची दुश्मनी घेणार, असा प्रश्न ग्राम समितीत असणाऱ्या इतर पदाधिकाऱ्यांना पडत आहे. आजही कोरोना मृतांचा ग्रामीण भागातील आकडा चिंताजनक दिसत आहे. अनेक ठिकाणी मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसून येत नाही, ही गंभीर बाब आहे. भंडारा तालुक्यातील काही गावात तर काहीजण चौकात गप्पा मारतानाचे चित्र आहे. सभेच्या बहाण्याने अनेकजण एकत्र येत आहेत. मात्र, या समित्या कारवाई करत नसल्याने या कोरोना दक्षता समितीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

बॉक्स

मुख्यालयी राहणे बंधनकारक करा

भंडारा तालुक्यातील अनेक गावे रेडझोनमध्ये आली आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भंडारा पंचायत समितीचे बीडीओ यांनी ग्रामसेवकांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करण्याची गरज आहे. ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःहून कोरोना चाचणी करण्याची गरज आहे. यासोबतच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्वतःला क्वारंटाईन करून घेणे गरजेचे आहे. स्वतःमुळे इतरांचा जीव धोक्यात येणार नाही, यासाठी जोपर्यंत नागरिक पुढाकार घेणार नाहीत तोपर्यंत कोरोना संसर्ग कमी होणार नाही.

बॉक्स

कारवाई होत नसल्याने कोरोना रुग्णसंख्येत वाढ

स्वतःमुळे इतरांचा जीव धोक्यात घालत अनेकजण ग्रामीण भागात फिरत आहेत. अशांवर ग्रामस्तरावरील कोरोना दक्षता समित्यांची कारवाई होणे आवश्यक आहे. मात्र, अनेक ठिकाणी ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्याने कारवाई नेमकी करायची कुणी असा प्रश्न निर्माण होत आहे. अनेक सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलीस पाटीलही पुढे होऊन कुणी रोष पत्करावा असे म्हणत असून यासाठी जिल्हा परिषदेचे सीईओ यांनी भागातील कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होण्यासाठी ग्रामसेवकांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करणे गरजेचे झाले आहे, अशी नागरिकांतून मागणी होत आहे. नगर परिषद प्रशासनाकडून अनेकदा कारवाया होतात. मात्र, त्या तुलनेत ग्रामीण भागात स्थानिक प्रशासनाकडून योग्य त्या प्रमाणात कारवाया होत नसल्याचे चित्र आहे.

Web Title: Action of Corona Vigilance Committees at village level is impossible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.