अवैध रेती टिप्परवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:37 AM2021-03-23T04:37:30+5:302021-03-23T04:37:30+5:30

बेटाळा येथून रेती भरून येणाऱ्या एमएच ३५ / एजे १०७७ क्रमांकाच्या टिप्परला तलाठी निखिल गजभिये, वैभव जाधव, विकास कदम ...

Action on illegal sand tipper | अवैध रेती टिप्परवर कारवाई

अवैध रेती टिप्परवर कारवाई

Next

बेटाळा येथून रेती भरून येणाऱ्या एमएच ३५ / एजे १०७७ क्रमांकाच्या टिप्परला तलाठी निखिल गजभिये, वैभव जाधव, विकास कदम व चंदू बावणे यांच्या पथकाने कुशारी-मोहाडी रस्त्यावर अडवून कागदपत्रांची पडताळणी केली. टिप्पर चालक लक्ष्मीकांत बोन्द्रे याच्या जवळ वैध परवाना नसल्याने टिप्पर जप्त करून पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला. हा टिप्पर नागपूर येथील सानू शेख यांच्या मालकीचा असल्याचे समजते.

याच रस्त्यावरून दररोज अनेक स्थानिक व्यक्तींचे टिप्पर व ट्रॅक्टर दिवसभर अवैध रेती वाहतूक करतात; परंतु अर्थपूर्ण व्यवहार सुरू असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. मात्र इतर शहरातील टिप्पर एखाद वेळ आलेच तर त्याच्यावर कारवाई करून आम्ही किती कर्तव्यदक्ष आहोत हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना भासविले जाते अशी जोरदार चर्चा येथे सुरू आहे.

Web Title: Action on illegal sand tipper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.