रेल्वेत ११४ प्रवाशांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 10:26 PM2019-05-09T22:26:15+5:302019-05-09T22:26:46+5:30

रेल्वे प्रवासात नियमबाह्य प्रवास करणाऱ्या तब्बल ११४ प्रवाशांवर गुरुवारी रेल्वे सुरक्षा दलाने कारवाई केली. त्यांच्याकडून १८ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला. दरम्यान मॅजीस्ट्रेट तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

Action on railway 114 passengers | रेल्वेत ११४ प्रवाशांवर कारवाई

रेल्वेत ११४ प्रवाशांवर कारवाई

Next
ठळक मुद्दे१८ हजारांचा दंड : भंडारा रोड स्थानकावर तपासणी शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी : रेल्वे प्रवासात नियमबाह्य प्रवास करणाऱ्या तब्बल ११४ प्रवाशांवर गुरुवारी रेल्वे सुरक्षा दलाने कारवाई केली. त्यांच्याकडून १८ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला. दरम्यान मॅजीस्ट्रेट तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
रेल्वेने प्रवास करताना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असते. परंतु नियमांची पायमल्ली करत अनेक जण प्रवास करीत असल्याचे गुरुवारी आढळून आले. भंडारा रोड रेल्वे स्थानकावर ५४ प्रवाशांना पकडण्यात आले. तर गोंदिया, इतवारी व तुमसर येथे ६० प्रवाशी ताब्यात घेण्यात आले. भंडारा रोड स्थानकावर मॅजीस्ट्रेट तपासणी शिबिर असल्याने सकाळपासूनच रेल्वे सुरक्षा दलाचे जवान तैनात होते. पकडलेल्या प्रवाशांवर दंड ठोठावला. ही कारवाई रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक जयसिंग, सहाय्यक उपनिरीक्षक ओम शेंडे, विभा औतकर, अरविंद टेंभुर्णीकर, वि.के. दुबे, महोम्मद कदुस, संजीव वैद्य, भूपेश देशमुख, उत्तम कंगाल, विनोद चमळदे, महेंद्र सिंग, प्रमोद किरपान यांनी केली.

Web Title: Action on railway 114 passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे