दोषी आढळल्यास कारवाई होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 09:39 PM2018-04-22T21:39:27+5:302018-04-22T21:39:27+5:30
मागील तीन महिन्यापासून साकोली तालुक्यातील रेतीघाटाहून अवैधरित्या रेतीचे उत्खनन होत आहे. या अवैध रेतीउत्खनासंदर्भात अनेक तक्रारी झाल्या. मात्र त्यांचा काही एक उपयोग झाला नाही. शेवटी हे प्रकरण लोकमतने जनतेसमोर आणले.
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : मागील तीन महिन्यापासून साकोली तालुक्यातील रेतीघाटाहून अवैधरित्या रेतीचे उत्खनन होत आहे. या अवैध रेतीउत्खनासंदर्भात अनेक तक्रारी झाल्या. मात्र त्यांचा काही एक उपयोग झाला नाही. शेवटी हे प्रकरण लोकमतने जनतेसमोर आणले. परिणामी लोकमत वृत्ताची दखल घेत अधिकाऱ्यांनी तिनही रेतीघाटाच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याची विश्वसनिय माहिती आहे.
साकोली तालुक्यातील रेतीघाटातून एका रॉयल्टीवर दोन ते तीन ट्रीप रेतीची अवैधरित्या वाहतुक केली जात होती. याकडे तहसील कार्यालयाचे दुर्लक्ष होते. या दुर्लक्षामुळे शासनाचा तिजोरीला दररोज कोट्यवधीचे नुकसान होत होते. तसेच शसन निर्णयाप्रमाणे ००००० रेती नुकसान होत होते. त्या रेतीघाटाचे क्षेत्रफळानुसार सिमांकन आखून देण्यात आले होते. मात्र पैशाच्या हव्यासापौटी सिमांकनाच्या बाहेरुन रेतीचा उपसा करण्यात आला आहे.
या संबंधीची तक्रार संबंधीत विभागाकडे करण्यात आली होती. मात्र या तक्रारीकडे दुर्लक्ष केले हाते. मात्र याच प्रकरणाला ‘लोकमत’ने समोर आणले व शेवटी अधिकाºयांनी यवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
तहसीलदार यांनी संबंधित मंडळ अधिकारी यांना आदेश दिले असून सिमांकनाबाहेरी रेतीची उचल करण्यात आली. त्याचा अहवाल सादर करण्याचेही आदेश देण्यात आले आहे.
अहवाल दिलाच नाही
रेतीघाटातून नियमाप्रमाणे रेतीची उचल होत आहे किंवा नाही तसेच ठरवून दिलेल्या क्षेत्रातून रेतीची खणन होत आहे किंवा नाही हे तपासणे तलाठ्याचे काम आहे. मात्र, गाव क्षेत्रात येणारे रेतीघाट सिमांकनात मोडतात किंवा नाही याचा अहवाल सादर करण्यात का आला नाही हा एक प्रश्न आहे.
या संदर्भात रेतीघाटात मागील पंधरा दिवसांपासून तलाठ्यांची नेमणूक करण्यात आल्याचेही समजते. याचा उपयोग खरच रेतीचे अवैध खणन थांबविण्यासाठी होतो काय? हे समजण्यापलिकडे आहे.