सोने चोरट्यांची आंध्रातील टोळी सक्रिय

By admin | Published: April 19, 2015 12:36 AM2015-04-19T00:36:26+5:302015-04-19T00:36:26+5:30

मंगलमूर्ती सराफा दुकानासमोरून दुचाकीच्या डिक्कीतून ५०० ग्रॅम सोन्याची बॅग आंतरराज्यीय डिक्की टोळीने लंपास केल्याचा ...

Active gold gangs active in gold gangs | सोने चोरट्यांची आंध्रातील टोळी सक्रिय

सोने चोरट्यांची आंध्रातील टोळी सक्रिय

Next

प्रकरण सोने चोरीचे : केवळ सहा सेकंदात उघडली डिक्की
तुमसर : मंगलमूर्ती सराफा दुकानासमोरून दुचाकीच्या डिक्कीतून ५०० ग्रॅम सोन्याची बॅग आंतरराज्यीय डिक्की टोळीने लंपास केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. टोळी आंध्रप्रदेशात सक्रीय आहे. कोकणातील पेन येथे डिक्कीतून सोने चोरी प्रकरण नुकतेच घडले. दोन्ही चोरीत साम्य दिसून येत आहे.
११ एप्रिल रोजी मंगलमूर्ती ज्वेलर्स दुकानासमोर उभ्या दूचाकीच्या डिक्कीतून चोरट्यांनी ५०० ग्रॅम सोन्याची दागीने असलेली बॅग लंपास केली. सराफा व्यवसायीक विवेक सोनी दुकानाचे शटर उघडत होते. केवळ सहा सेकंदात चोरट्यांनी हे कृत्य केले.
प्रथम दुकान मालक विवेक सोनी संभ्रमात पडले. त्यांनी घरी आईशी भ्रमणध्वनीवर संपर्क केला. त्यानंतर ते स्वत: घरी जावून सोन्याची बॅग घरी राहली असावी याची खातरजमा करण्यासाठी गेले. त्यानंतर बँकेच्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये पाहिले व पोलिसांशी संपर्क केला. सकाळी ११.१५ मिनिटांनी शहराची नाकेबंदी करण्यात आली. परंतु काही लागले नाही. दुचाकीच्या डिक्कीची तपासणी केल्यावर डिक्कीचा लॉकमध्ये बदल दिसत आहे.
डिक्की चाबीने उघडण्यात आली नाही तर येथे इतर साहित्याने उपयोग करण्यात आला आहे, अशी डिक्की केवळ सराईत चोरटेच उघडू शकतात. प्रथम शहर व परिसरातील संशयीतांची चौकशी येथे करण्यात आली. परंतू त्यातून काहीच शोध लागेल, असा सुगावा लागला नाही. कोकणातील पेनमध्ये डिक्कीतून सोने चोरी झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. चोरट्यांनी तिथे वापरलेले साहित्यापासून संशय व्यक्त करण्यात येत आहे.
आंध्रप्रदेश राज्यातील ही टोळी आहे. या टोळीचा हातखंडा मानला जातो. जिल्ह्यात अशी चोरी प्रथमच झाली आहे. या टोळीचा परस्पर संबंध तपासल्या जात आहे, अशी माहिती तुमसचे उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद भोईटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Active gold gangs active in gold gangs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.