महागाईविरोधात कार्यकर्त्यांनी आवाज बुलंद करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:24 AM2021-06-26T04:24:52+5:302021-06-26T04:24:52+5:30
लाखनी : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल, डिझेल, गॅस व खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. रोजच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना मनस्ताप ...
लाखनी : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल, डिझेल, गॅस व खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. रोजच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना मनस्ताप होत आहे. केंद्र सरकारच्या तुघलकी धोरणाविरोधात राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने जनतेला सोबत घेऊन केंद्र शासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरणे अत्यंत गरजेचे झाले आहे. चुकीच्या धोरणांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून आगामी निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाचे अधिकाधिक प्रतिनिधी निवडून आणण्याकरिता प्रयत्न करण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.
लाखनी येथील संताजी मंगल कार्यालयात खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्ता व पदाधिकारी बैठक सोमवारी पार पडली. या वेळी पटेल यांनी परिसरातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेत पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत विविध विषयांवर चर्चा केली. त्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, माजी खासदार मधुकर कुकडे, जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे, बीडीसीसी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, नरेश माहेश्वरी, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष सरिता मदनकर उपस्थित होते.
खासदार पटेल म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी सरकार गोरगरिबांच्या, वंचितांच्या विकासासाठी व शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे. राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने राज्य शासनाच्या या कल्याणकारी योजनांचा लाभ गरजू, गोरगरीब, वंचितांना मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यायचा आहे. येणारा काळ भंडारा-गोंदियाच्या विकासाचा सुवर्णकाळ असेल. या वेळी दामाजी खंडाईत, डॉ. विकास गभने, धनू व्यास, विनायक बुरडे, प्रभाकर सपाटे, अशोक चोले, सुधन्वा चेटुले, राजेश निंबेकर, नागेश वाघाये, माया अंबुले, संगीता उईके, ऊर्मिला आगाशे, सुनीता खेडीकर, रजनी मुळे, त्रिवेणी पोहरकर, सचिन भैसारे, अशोक हजारे, जितेंद्र बोंद्रे, रोहित साखरे, मोहित शेळके, राजू पठाण, सुखदेव गोंधुळे व तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमात खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सोहेल चव्हाण, साकेत पठाण, अरिफ बेग यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. खासदार पटेल यांनी पुष्पगुच्छ व पक्षाचा दुपट्टा वापरून त्यांचे स्वागत केले.
===Photopath===
250621\img-20210621-wa0163.jpg
===Caption===
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रफुल पटेल