परंपरागत निवडणूक चिन्हांसोबत आधुनिक लॅपटाॅप, पेनड्राईव्ह, हेडफाेन अन् माऊसचाही समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:35 AM2021-01-03T04:35:37+5:302021-01-03T04:35:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आणि अर्जांच्या छाननीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता ...

In addition to traditional election symbols, modern laptops, pen drives, headphones and mice are also included. | परंपरागत निवडणूक चिन्हांसोबत आधुनिक लॅपटाॅप, पेनड्राईव्ह, हेडफाेन अन् माऊसचाही समावेश

परंपरागत निवडणूक चिन्हांसोबत आधुनिक लॅपटाॅप, पेनड्राईव्ह, हेडफाेन अन् माऊसचाही समावेश

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आणि अर्जांच्या छाननीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता उमेदवारांच्या नजरा ४ जानेवारी राेजी उमेदवारी मागे घेण्याच्या दिवसाकडे लागल्या असून यानंतर चिन्हांचे वाटप हाेणार आहे. निवडणूक आयाेगाने आता १९० चिन्हांचा पर्याय दिला आहे. त्यातील चिन्हे सुध्दा मजेदार असून पेट्रोल पंप, नारळ, शिटी, नारळ, फुलकोबी, ढोबळी मिरची, फळा, पुस्तक, विहीर, जेवणाची थाळी, डोेक्यावरचा भारा, काचेचा पेला, कंगवा, पोळपाट बेलणे भूईमूग, वाटाणा आदी मजेदार चिन्हे आहेत. त्यामुळे कुणाला मिळेल पेट्रोल पंप, कोण वाजविणार शिटी अन् कोणत्या उमेदवाराला मिळणार नारळ अन् लिफाफा हे ४ जानेवारीला स्पष्ट होणार आहे. त्यामुळे निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना या निवडणूक चिन्हावर मते मागताना बराच विनोद देखील होणार आहे.

ग्रामपंचायतीची निवडणूक ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या चिन्हाखाली लढविली जात नाही. ही पक्ष विरहित निवडणूक असते. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या चिन्हांवर उमेदवारांना निवडणूक लढवावी लागते. मात्र, या निवडणुकीत निवडणूक विभागानेे चिन्हांची संख्या वाढवून १९० केली आहे. यातील बरीच चिन्हे मजेदार असून कुणाला भूईमुग मिळते किंवा वाटणा मिळतो याकडे ग्रामीण जनतेचे लक्ष लागले आहे.

अशी आहेत चिन्हे

निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी १९० चिन्हांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये कपाट, सफरचंद, ऑटोरिक्षा, फुगा, बॅट, पुस्तक, बादली, केक, कॅमेरा, कॅरम बोर्ड, कोट, टीव्ही, रिमोट.

कंगवा, हिरा, कप-बशी, फुटबॉल, चष्मा, हॉकी, ईस्त्री, जग, केटली, चावी, लॅपटॉप, लुडो, कढाई, पेन ड्राईव्ह, कैची, अननस, छत्री, पांगुळगाडा, टोपली, चिमटा, नांगर, चावी.

फलंदाज, विजेचा खांब, डिश अँटेना, ऊस, बासुरी, मिक्सर, पंचिंग मशीन, फ्रीज, शिवण, यंत्र, स्कूटर, सोफा, बिगुल, तुतारी, टाईप राईटर, अक्रोड, कलिंगड, पाण्याची टाकी, विहीर, सिटी, चिमटा, नांगर, सूप, रोडरोलर, कुलर.

वेगवेगळ्या चिन्हांवर लढावे लागणार

ग्रामपंचायतीची निवडणूक ही पक्ष विरहित असते. एक वाॅर्ड एक मतदारसंघ या नियमानुसार निवडणूक लढविली जाणार आहे. यामुळे प्रत्येक उमेदवाराला वेगवेगळ्या चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे एका वाॅर्डात एकच चिन्ह असणार आहे.

भुईमूग, हिरवी मिरची, वाटाणे, मका यासह स्कूटर, कात्री आणि कंगवाही

फळा, पुस्तक, साबण, टूथब्रश, चहा गाळणी, तंबू, भाला फेकणारा, डोक्यावरील भारा, ब्रिफकेस, पेट्रोल पंप, चालण्याची काठी, वाॅल हूक, बिगुल, तुतारी, लिफाफा, कलिगंड, हिरवी मिरची, भेंडी, जेवणाची थाळी, पेन ड्राईव्ह, माऊस, खिडकी, डिझलपंप, मण्यांचा हार, बिस्कीट, गरम पाण्याचे हिटर, फुलकोबी, खटारा, गालिचा, पोळपाट बेलणे, होडी, फलंदाज, बाकडे, दोने पाने, बंगला आदी नवीन चिन्हांची भर पडली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांची संख्या अधिक राहत असल्याने निवडणूक आयोगाने निवडणूक चिन्हांच्या संख्येत वाढ केली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप ४ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाने १९० चिन्हे निश्चित केली आहेत. निवडणूक आयाेगाने दिलेल्या सूचनांचे पालक करुन चिन्हांचे वाटप करण्यात येईल.

-शिवराज पडाेळे, निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी, भंडारा

Web Title: In addition to traditional election symbols, modern laptops, pen drives, headphones and mice are also included.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.