-तर अड्याळवासीयांना मिळणार रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 10:13 PM2018-12-26T22:13:12+5:302018-12-26T22:13:26+5:30
बहूचर्चित विषयावर चर्चा व्हावी या दृष्टीकोणातून बुधवारी आयोजित विशेष ग्रामसभेत त्या विषयावर पुर्णविराम मिळाला. अड्याळ येथे होवू घातलेल्या दोन योजनांवर विशेष ग्रामसभेने शिकामोर्तब केल्यानंतर अड्याळ वासीयांना त्या योजनेत रोजगार मिळण्याचे मार्ग खुले झाले आहेत.
विशाल रणदिवे।
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : बहूचर्चित विषयावर चर्चा व्हावी या दृष्टीकोणातून बुधवारी आयोजित विशेष ग्रामसभेत त्या विषयावर पुर्णविराम मिळाला. अड्याळ येथे होवू घातलेल्या दोन योजनांवर विशेष ग्रामसभेने शिकामोर्तब केल्यानंतर अड्याळ वासीयांना त्या योजनेत रोजगार मिळण्याचे मार्ग खुले झाले आहेत.
अड्याळ येथे मागील दोन महिन्यांपासून गावाच्या हद्दीत लागणाऱ्या दोन प्लांटबाबत एकच चर्चा होती. जोपर्यंत याबाबत ग्रामसभेत चर्चा होणार नाही. तोपर्यंत सदर प्रकल्प पुर्णत्वास जाणार नाही, याची कुणकुण सर्वांनाच होती.
बुधवारी आयोजित केलेल्या विशेष ग्रामसभेत तब्बल २२२ ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शविली. ग्रामपंचायतीने ग्रामसभेच्या माध्यमातून संबंधित विषयावर कायदेशीर व नियमानुसार काम केल्याची चर्चा होती.
गावात होवू घातलेल्या प्लांटच्या ठरावाच्या बाजूने बहूमत मिळाले. मात्र यात अनेक प्रश्न अजनूही तांत्रिकरित्या अनुत्तरीत आहेत.
नियमानुसार थ्रेशर प्लांट परवाना देण्याच्या बाजूने ठराव मंजूर झाल्याचे ग्रामसभेचे अध्यक्ष तथा सरपंच जयश्री कुंभलकर यांनी जाहिर केले. विशेष म्हणजे ठरावावर आक्षेपही घेण्यात आला होता.