सरपंच निवडणुकीसाठी अध्यासी अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:36 AM2021-02-10T04:36:26+5:302021-02-10T04:36:26+5:30
मोहाडी तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींमधील सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक १२ व १५ फेब्रुवारी रोजी घेतली जाणार आहे. या निवडणुकीसाठी ...
मोहाडी तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींमधील सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक १२ व १५ फेब्रुवारी रोजी घेतली जाणार आहे. या निवडणुकीसाठी १२ फेब्रुवारी रोजी पंचायत समितीमधील कनिष्ठ लेखाधिकारी जे. डी. आगाशे (कान्हळगाव), विस्तार अधिकारी आय. एम. भांडारकर (पिंपळगाव कान्ह), लेखाधिकारी जे. व्ही. सुखदेवे (पिंपळगाव झं.), विस्तार अधिकारी आर. एम. रोडके (पाचगाव), शिक्षण विस्तार अधिकारी विनोद चरपे (मांडेसर), सहायक शाखा अभियंता आर. बी. दिपटे (जांभोरा), विस्तार अधिकारी बी. आर. भोयर (पांजरा बोरी), अधीक्षक आर. डी. मरकाम (खडकी), विस्तार अधिकारी आर. डी. तेलमासरे (केसलवाडा) तर १५ फेब्रुवारी रोजी कनिष्ठ लेखाधिकारी जे. डी. आगाशे (पाहुणी), विस्तार अधिकारी आय. एम. भांडारकर (दहेगाव), लेखाधिकारी जे. व्ही. सुखदेवे (रोहा), विस्तार अधिकारी आर. एम. रोडके (भिकारखेडा), सहायक शाखा अभियंता आर. बी. दिपटे (देव्हाडा), विस्तार अधिकारी बी. आर. भोयर (सालई खुर्द), अधीक्षक आर. डी. मरकाम (ताडगाव), विस्तार अधिकारी आर. डी. तेलमासरे (पारडी) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी १० ते १२ वाजतापर्यंत नामनिर्देशन दाखल केले जाईल. दुपारी २ वाजतापासून सभा घेण्यात येणार आहे. दुपारी २ ते २.१० पर्यंत नामनिर्देशन छाननी केली जाणार. २.१० ते २.२० पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेतले जातील. त्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया केली जाणार आहे. कान्हळगाव, जांभोरा, पाचगाव, खडकी या ठिकाणी सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव करण्यात आला आहे. अनुसूचित जाती प्रवर्गात एकच उमेदवार निवडून आलेला आहे. त्यामुळे तेथील निवडणूक बिनविरोध होणार आहे. इतर ग्रामपंचायतींमध्ये सध्या खेचाखेची सुरू आहे. यात कुणाचा चेहरा गुलालाने उधळतो, ते निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे.