खासगी माध्यमिक शाळेतील शिक्षकांचे समायोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 09:33 PM2018-10-14T21:33:21+5:302018-10-14T21:33:41+5:30

जिल्ह्यातील खासगी अनुदानीत माध्यमिक शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन जिल्हा परिषदेच्या शाळेत त्वरीत करण्यात यावे, अशी मागणी भाजपच्या शिक्षक सेलने केली आहे. या आशयाचे निवेदन जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना देण्यात आले आहे.

Adjust private school teachers | खासगी माध्यमिक शाळेतील शिक्षकांचे समायोजन करा

खासगी माध्यमिक शाळेतील शिक्षकांचे समायोजन करा

Next
ठळक मुद्देभाजप शिक्षक सेलची मागणी : शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील खासगी अनुदानीत माध्यमिक शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन जिल्हा परिषदेच्या शाळेत त्वरीत करण्यात यावे, अशी मागणी भाजपच्या शिक्षक सेलने केली आहे. या आशयाचे निवेदन जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना देण्यात आले आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे भंडारा जिल्ह्यातील शिक्षकांच्या व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बऱ्याचशा मागण्या अजूनही प्रलंबित आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही त्या सोडविण्यात आलेल्या नाहीत. याबाबत शिक्षकांच्या समस्या संदर्भात वरिष्ठांचे ध्यानाकर्षण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या शिक्षक सेलच्या जिल्हा शाखेमार्फत मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यात अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन न करणाऱ्या शाळांचे वेतनेत्तर व वेतन अनुदान बंद करण्यात यावे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदे संच मान्यतेमधून व्यपगत करावे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना वेतन विवरण पावती देण्याचे शासन आदेशांतर्गत पालन करावे, अंशदाई निवृत्ती वेतन योजना कपातीच्या पावत्या व्याज परिगणना करून देण्यात यावी, शालेय ग्रंथालयासाठी वेतनेत्तर अनुदानातून दरवर्षी शालेय गं्रंथालयाकरिता गं्रथखरेदी न करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यात यावी, शिक्षण भरती पवित्र पोर्टल कार्यप्रणालीबाबत प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात यावे, शिक्षक भरती लवकर करण्यात यावी, वेतन देयकासोबत एकाच प्रकारची माहिती वारंवार मागविण्यात येऊ नये, सत्राच्या सुरुवातीलाच कालबद्ध कार्यक्रम निश्चित करावा आदी मागण्यांचा यात समावेश आहे. मागण्यांचे निवेदन देताना शिक्षक सेलचे विदर्भ प्रांत संयोजक डॉ.उल्हास फडके, संयोजक कैलाश कुरंजेकर, शशांक चोपकर, ज्ञानेश्वर बोडखे, माधव रामेकर, मंगला साटोणे, घनश्याम तरोणे, प्रसन्न नागदेवे, धनंजय पुस्तोडे, अरुण मोखारे, अरुण पारधी, शरद गिरी यासह अन्य पदाधिकाºयांचा समावेश आहे.

Web Title: Adjust private school teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.