रेती चोरीला आळा घालण्यात प्रशासन अपयशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 10:10 PM2018-06-16T22:10:18+5:302018-06-16T22:10:18+5:30
तालुक्यातील विविध रेती घाटांवर रेतीची चोरी करण्यात येते. रेती चोरीची सूट काही विशिष्ट व्यक्तींनाच दिली जाते. काही पक्षाच्या राजकीय प्रभावाखाली प्रशासन काम करीत असून रेती चोरींवर प्रतिबंध करण्यात प्रशासन अपयशी असल्याचा ठपका ठेवण्यात आला. तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसलिदार मोहाडी यांच्या वतीने मुख्यमंत्री, कृषीमंत्री, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : तालुक्यातील विविध रेती घाटांवर रेतीची चोरी करण्यात येते. रेती चोरीची सूट काही विशिष्ट व्यक्तींनाच दिली जाते. काही पक्षाच्या राजकीय प्रभावाखाली प्रशासन काम करीत असून रेती चोरींवर प्रतिबंध करण्यात प्रशासन अपयशी असल्याचा ठपका ठेवण्यात आला. तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसलिदार मोहाडी यांच्या वतीने मुख्यमंत्री, कृषीमंत्री, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
राष्ट्रवादी पक्षाचे खासदार मधुकर कुकडे, माजी आमदार गोविंद शेंडे, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष वासुदेव बांते, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रभू मोहतुरे, नगराध्यक्षा गीता बोकडे, उपाध्यक्ष सुनिल गिरीपुंजे, नगर परिषद सदस्य मनिषा गायधने, रागीनी सेलोकर, किरण अतकरी, गजानन झंझाड, खुशाल कोसरे, प्रदीप वाडीभस्मे, भास्कर कढव, झगडू बुधे, पुरूषोत्तम पातरे, रफिक सैय्यद, जितेंद्र सोनकुसरे, सुर्यभान बावणे, मनिषा मडामे, शारदा फुले, सुनिता सोरते, कविता बावणे, विजय पारधी, वर्षा बारई, फिरोज शेख, किशोर पात्रे, राजू उपरकर, शंकर शेंडे, कैलास तितिरमारे, देवेंद्र ईलमे, राजेश बाभरे, कैलास मते, वामन बोकडे, ज्ञानेश्वर आगाशे आदी राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते निवेदन देतानी उपस्थित होते.
केवळ १६ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफिचा लाभ मिळाला, श्रावणबाळ, वृद्धापकाळ योजनेचा लाभ देतानी पक्षभेद केला जातो. गॅस कनेक्शन नसताना रॉकेल दिले जात नाही.
आॅनलाईन सात बारामध्ये खूप चूका झाल्या आहेत. शासन निर्णय होवूनही वर्ग-२ च्या शेतजमिनी वर्ग १ मध्ये करण्यात आल्या नाही आदी विषयावर खासदार मधुकर कुकडे यांनी तहसिलदार यांच्यासोबत चर्चा केली.
तसेच प्रत्येक शेतकºयांची संपूर्ण कर्जमाफी करून त्यांना त्वरित पीक कर्ज वाटप करावा, आॅनलाईन सात बाराची चुका दुरूस्ती करावी, सात बारा वर शेतातील झाडांची नोंद करावी, वर्ग २ च्या जमिनी सरसकट वर्ग १ करण्यात याव्यात, श्रावणबाळ, वृद्धापकाळ व निराधार योजनेतील लाभार्थ्यांना १२०० रूपये अनुदान देण्यात यावे, गॅस कनेक्शन नसणाºयांना रॉकेल पुरवठा करावा, गरजू महिलांना उज्वला योजने अंतर्गत गॅस कनेक्शन देण्यात यावे, नगरपंचायत मोहाडी येथील रमाई घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना त्वरित घरकुलाचा लाभ देण्यात यावा, अन्न सुरक्षा योजनेतील झालेल्या घोळाची चौकशी करून गरजुंनाच अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्यात यावा या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
तहसीलदारांच्या समक्ष मांडली कैफियत
एका गरीब महिलेला गॅस कनेक्शन दिला नसतानाही तिला रॉकेल बंद केले. चक्क त्या महिलेने तहसिलदाराच्या दालनात येवून आपली कैफियत व प्रशासनाची पोलखोल मांडली.
वृद्ध, विधवा, निराधार आदींना लाभ देताना लाभार्थी सत्ता पक्षाचा आहे हे तपासूनच समितीचे पदाधिकारी अर्ज मंजूर करतात असा ठपका प्रभू मोहतुरे व झगडू बुधे व आदींनी ठेवला.