सरपंच सेवा संघाच्या उपोषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:33 AM2021-02-12T04:33:35+5:302021-02-12T04:33:35+5:30
उपोषण करते तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात चिचाळ : सरपंच सेवा महासंघ भंडारा जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने सरपंच सेवा महासंघ ...
उपोषण करते तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात
चिचाळ : सरपंच सेवा महासंघ भंडारा जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने सरपंच सेवा महासंघ पवनी तालुक्याच्यावतीने मागण्यांच्या पूर्ततेसाठी उपोषण सुरू केले आहे; मात्र या सरपंच सेवा संघाच्या उपोषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
प्रपत्र ड यादीतील खोळ दूर करून ग्रामसभेने मान्यता दिलेल्या यादीला प्राधान्य देण्यात यावे, उपविभागीय ग्रामीण पाणी पुरवठा कार्यालय पवनी येथे कायम ठेवण्यात यावे, १५ व्या वित्त अंतर्गत दहा टक्के निधी पंचायत समितीला जातो, तो निधी ग्रा.पं.ला देण्यात यावा व जिल्हा परिषद पाणी पुरवठा योजनेंतर्गत ग्रामपंचायत पाणी पुरवठा बिलातील ५० टक्के बिल जिल्हा परिषदेने भरावे, या मागण्यांसंदर्भात संघाच्यावतीने बेमुदत उपोषण सुरू आहे. आंदोलनाला पाच दिवस उलटूनही एकही शासन- प्रशासनाच्या पुढाऱ्यांनी उपोषण मंडपाला भेट दिली नसल्याने तालुक्यात लोकप्रतिनिधीबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.
पुणे तालुक्यात ७९ ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेतून पाठविलेल्या घरकुल यादी यांची ऑनलाइन प्रक्रिया झाली आहे; मात्र प्रकाशित केलेल्या त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येत आहे. प्रशासनाने केलेल्या गोळ्यांमुळे गावागावात संभ्रम निर्माण झाला आहे. हा घोळ गावातील सरपंच यांनीच केला, असा ग्रामस्थ सरपंचावर आरोप करीत आहेत, त्यामुळे ग्रामस्थ पाणीपट्टी कर घर टॅक्स भरण्यास नकार दर्शवित आहेत. यासंदर्भात जनहितार्थ पवनी तालुक्यातील ७९ ग्रामपंचायतीमधून जिल्हाध्यक्ष यादवराव मेघरे, पवनी तालुका अध्यक्ष अनिता गिऱ्हेपूंजे, दीपक तिघरे, नूतन कुर्झेकर, शरद तिघरे, धीरज गायमुखे, किशोर ब्राह्मणकर, सतीश घरडे, अरविंद सुखदेवे, रनभिड सेलोटे, राजू तलमले, विपीन बोरकर, सुकेशिनी वैद्य, बेबीनंदा कांबळे, जयश्री रोडगे, वैशाली रामटेके, भाग्यश्री येलमुले, लोपमुद्रा वैरागडे, सुषमा टेंबरे, जयश्री कुंभलकर, कविता गडपायले यांचा उपोषणकर्त्यांमध्ये समावेश आहे.
पाच दिवस उलटूनही उपोषण मंडपाला एकही लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांनी भेट न दिल्याने आंदोलन आता उग्र रूप धारण तर मागण्या पूर्ण होईस्तोवर उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका सरपंच सेवा महासंघ जिल्हाध्यक्ष यादवराव मेगरे, पवनी तालुकाध्यक्ष अनिता गिऱ्हेपुंजे, सचिव दीपक तिघरे यांनी विचार व्यक्त केले. उपोषण मंडपाला राँकाचे तातुकाध्यक्ष लोमेश वैद्य व चेतक डोंगरे यांनी भेट दिली.