पूरग्रस्त शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलनाची प्रशासनाने घेतली दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:26 AM2020-12-27T04:26:38+5:302020-12-27T04:26:38+5:30
वैनगंगा नदीला आलेल्या पुरात भंडारा तालुक्क्यातील टाकळी खंमाटा येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या पूरग्रस्तांना अद्यापही शासनाने ...
वैनगंगा नदीला आलेल्या पुरात भंडारा तालुक्क्यातील टाकळी खंमाटा येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या पूरग्रस्तांना अद्यापही शासनाने मदत न दिल्याने याबद्दलची तक्रार जिल्हाधिकारी, तहसिलदार, उपविभागीय अधिकारी भंडारा तसेच विधानसभा अध्यक्ष यांना देण्यात आली होती. तहसिलदार भंडारा यांनी मदती संदर्भात यापूर्वी खोटेनाटे उत्तर देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केली होती. या प्रकरणाची तत्काळ योग्य चौकशी करून खमाटा/टाकळी येथील शेतक-यांना त्यांची रक्कम देण्यात यावी परंतु शेतक-यांना रक्कम मिळाली नाही म्हणून जिल्हाधिकारी संदीप कदम यांची भेट घेतली. जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे शेतक-यांचे नुसान झाले होते. तहसिल कार्यालयाच्या दिरंगाईमुळे शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित आहेत. शेतकरी दिवाळी पासून चकरा मारत होते. सनाकडूनअद्यापही मदत न मिळाल्याने शेवटी या भागातील शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. कोथुर्णा रोड भंडारा येथे काळ्याफित लावून शासनाचा निषेध करीत रस्त्यावर उतरून आंदोलन केले. यावेळी शासनाच्या वतीने मंडळ अधिकारी सतदेवे यांनी स्वतः आंदोलनस्थळी येवून निवेदन स्वीकारले. झालेल्या चुकांची दुरूस्ती करून तत्काळ पैसे देण्याची कार्यवाही करू असे सांगितले. यावेळी अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे, विष्णुदास लोणारे, पुरूषोत्तम गायधने, कोठीराम पवनकर, प्रकाश भोपे, मोहन गायधने, गणेश चौधरी, विनोद भोपे, राजू बोरकर, नत्थु गायधने बैलबंडीसह शेतक-यांनी आंदोलनात सहभाग घेतला. २६ लोक १२ के