अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघात प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:31 AM2021-03-15T04:31:32+5:302021-03-15T04:31:32+5:30
भंडारा : अनेक वर्षांपासून महाराष्ट्र शिक्षक संघटनेत राहून कार्य करणारे तथा तालुक्याचे शिक्षक नेते विठ्ठल हारगुडे यांनी अखिल महाराष्ट्र ...
भंडारा : अनेक वर्षांपासून महाराष्ट्र शिक्षक संघटनेत राहून कार्य करणारे तथा तालुक्याचे शिक्षक नेते विठ्ठल हारगुडे यांनी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघात प्रवेश केला. संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुड़े, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर दमाहे यांच्या प्रभावी, सेवाभावी आणि अविरत समस्या सोडविणारे नेतृत्व, जिल्हा परिषद व शासकीय कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष केशव बुरडे यांचे चौफेर व अष्टपैलू नेतृत्व, शिक्षकनेते श्रावण लांजेवार यांच्या व्यापक व सर्वसमावेशक नेतृत्वावर विश्वास ठेवून हा प्रवेश करण्यात आला. अखिल संघटना ही जिल्ह्यातील प्रमुख संघटना असून नेहमीच शिक्षकांच्या समस्यांना वाचा फोडून न्याय मिळवून देण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून अविरत केले जाते. जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील प्रमुख नेतृत्वाच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन त्यांनी हा प्रवेश केला. प्रवेशा प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना विठ्ठल हरगुडे म्हणाले की, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ हा सर्व शिक्षक बंधू भगिनींच्या समस्या मनात कोणतेही आकस न ठेवता प्राधान्याने व अत्यंत पोटतिडकीने सोडविणारी व सर्वाना सोबत घेऊन चालणारी एक प्रमुख आणि सर्वात मोठी संघटना आहे. जिची पाळेमुळे संपूर्ण देशात अत्यंत खोलवर रुजली आहेत. अखिल संघाच्या अशा प्रभावी नेतृत्वाने प्रभावित होऊन मी संघटनेत प्रवेश करीत असून याच तत्वार काम करून मी शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध आहे, असे ते म्हणाले. प्रवेश कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुडे हे होते. प्रमुख उपस्थितीमध्ये शाखाध्यक्ष मुलचंद वाघाये, संचालक विलास टीचकुले, संचालक विकास गायधने, संतोष खंडारे, रमेश पारधीकर, रशेषकुमार फटे, आदेश बोम्बार्डे, बालक्रीष्ण भुते, सुरेश कोरे, घनश्याम मेंढे, धनराज रोटके, वसंता खराबे, ज्ञानेश्वर लांडगे, सुरेश येळे, ईश्वर राणे, चेतन भुळे, मधुसूदन डहाके, विजय गरपडे, भारत राघोर्ते, धनराज वाघाये, भाविक रामटेके, मेघराज वाघाये, हितेंद्र शेंडे, विलास बुरडे, महेंद्र लांजेवार, आर. एस. बोपचे, के.ए. सेलोकर, सुर्यकांत खराबे, ओंकार कठाणे यांच्यासह अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. संचालन संतोष खंडारे यांनी तर आभार रशेषकुमार फटे यांनी केले.