दूषित पाण्याने अड्याळवासी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 10:58 PM2018-01-31T22:58:47+5:302018-01-31T22:59:08+5:30
एरवी पावसाळ्यात गढूळ तथा दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होतो. मात्र उन्हाळ्याच्या दिवसात ही जंतुयुक्त व दूषित पाणीपुरवठ्याने अड्याळवासी त्रस्त झाले आहेत. अशावेळी ग्रामस्थांनी पाणी विकत घेऊन प्यायचे काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
विशाल रणदिवे ।
आॅनलाईन लोकमत
अड्याळ : एरवी पावसाळ्यात गढूळ तथा दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होतो. मात्र उन्हाळ्याच्या दिवसात ही जंतुयुक्त व दूषित पाणीपुरवठ्याने अड्याळवासी त्रस्त झाले आहेत. अशावेळी ग्रामस्थांनी पाणी विकत घेऊन प्यायचे काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
दूषित, दुर्गंधी युक्त पाण्याचा अथवा जंतुयुक्त पाण्याचा प्रश्न हा आताचा नसून अंदाजे २० वर्षापासून सतत भेडसावत आहे. मात्र ही समस्या तो आजपर्यंत ‘जैसे थे’ आहे. याला जबाबदार ग्रामपंचायत प्रशासन आहे. आजी-माजी सरपंचांसह सदस्यांनी याकडे गांर्भियाने लक्ष दिले नाही, अशी गावात चर्चा आहे. कुठे एक तर कुठे दोन दिवसातून वेळेनुसार पाणी पुरवठा करत असल्याचे बोलले जाते. बुधवारला गुजरी चौकातील सकाळी ८ च्या सुमारास पाणी भरत असताना पाण्यात बारिक जंतु आढळले. यावेळी वॉर्ड मेंबर पंकज ढोक उपस्थित होते. पाण्याचे जलकुंभ स्वच्छ करण्यात आले.