प्रगत व्यवसायाला आत्मियतेची जोड आवश्यक
By admin | Published: February 15, 2017 12:27 AM2017-02-15T00:27:42+5:302017-02-15T00:27:42+5:30
पशुपालन आत्मीयता व व्यवसायीक दृष्टीने केल्यास प्रत्येक कुटुंबाला रोजागर देण्याची क्षमता पशुपालकात आहे.
विनायक बुरडे यांचे प्रतिपादन : जेवनाळा येथे पशुआरोग्य शिबिर, १७५ जनावरांची तपासणी
पालांदूर : पशुपालन आत्मीयता व व्यवसायीक दृष्टीने केल्यास प्रत्येक कुटुंबाला रोजागर देण्याची क्षमता पशुपालकात आहे. गाईची संख्या भारतात अव्वल दर्जाची असून दूध निर्मिती करून पशुंचे आरोग्य व स्वत:ची प्रगती शक्य असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद बांधकाम सभापती विनायक बुरडे यांनी केले.
पशुसंवर्धन विभाग व पशु वैद्यकीय दवाखाना पालांदूरच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र स्पर्धात्मक कृषी विकास प्रकल्प अंतर्गत जनावरांचे व्यंधत्व निवारण व औषधोपचार शिबिर जेवनाळा येथे घेण्यात आले होते. यावेळी विनायक बुरडे बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हा परिषद सदस्य वर्षा रामटेके, सरपंच वैशाली बुरडे, पशुधन विकास अधिकारी डॉ. नरेश कापगते, डॉ. प्रज्ञा झावरे, डॉ. संजय पांडे, डॉ. भाग्यश्री राठोड, चंद्रशेखर लोहारे, घनश्याम माटूरकर उपस्थित होते.
यात गावातील उत्साही शेतकऱ्यांनी सहभाग घेत पशुपालनाविषयी विस्तृत माहिती विचारली. स्वत:चा अनुभव व पशु वैद्यकीय अधिकारी वर्गाचे मार्गदर्शन घेत नव्या अभ्यासक ज्ञानाची पेरणी यावेळी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली. या शिबिरात १७५ जनावरांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. प्रज्ञा झावरे यांनी पशुआहार, आरोग्य व इतर घटकांचा अभ्यास पशुपालकांना दिला. शेतकऱ्यांनीही डॉ. झावरेंच्या अभ्यासक व मार्गदर्शनाबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाकरिता कर्मचारी तिकवडू बुराडे, उमेश टिचकुले, अर्जुन खंडाईत सर्व पालांदूरसह दवाखान्यांचे कर्मचाऱ्यांनी सहर्ष सहकार्य केले. आभार डॉ. नरेश कापगते यांनी मानले. (वार्ताहर)