शुद्ध पाण्यासाठी अड्याळवासीयांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:39 AM2021-09-23T04:39:54+5:302021-09-23T04:39:54+5:30
अड्याळ : पंधरा वर्षे झालीत अड्याळ ग्रामपंचायत प्रशासन शुद्ध पाणी ग्रामस्थांना देण्यासाठी धावपळ करते आहे. दुसरी कशी तरी चालली ...
अड्याळ : पंधरा वर्षे झालीत अड्याळ ग्रामपंचायत प्रशासन शुद्ध पाणी ग्रामस्थांना देण्यासाठी धावपळ करते आहे. दुसरी कशी तरी चालली आणि तिसऱ्या फेरीत दोनदा निवडणुका झाल्यात सर्व वेळ रस्सीखेच करण्यात गेले,नळ योजनेची कामे जिथल्या तिथंच राहिली. पण शोकांतिका अशी आहे की आजही ग्रामस्थांना मात्र पिण्याचे शुद्ध पाणीसुध्दा मिळेनासे झाले आहे. ना नवीन फिल्टर प्लांट तयार करण्यात आले, ना नळ योजनेच्या कामावर लक्ष दिले. सोमवारी अड्याळ ग्रामस्थांना अशुद्ध पाणी मिळाले. नळाला आलेले पाणी हे पिण्यायोग्य तर नव्हतेच पण वापरण्यायोग्यसुद्धा नव्हते. यामुळे गावात साथरोग पसरण्याची दाट शक्यता आहे. गावातील नळ योजनेचा फज्जा उडाला असून, यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होऊन ग्रामपंचायत प्रशासन तथा संबंधित अधिकारी याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाहीत. दोन वर्षे झाली रस्ते नाली खोदकाम करून, नवीन नळयोजनेची पाईपलाईन करून, पण शासनाच्या लाखो रुपयांचा उपयोग शून्य. गावात एक नाही दोन नाही तर तब्बल तीनदा नळ योजनेची कामे करण्यात आली. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्ष तथा अधिकाऱ्यांच्या व राजकीय पाठबळावर काही मंडळींनी आपले हित साधून घेतले तर अड्याळ ग्रामवासीयांचे अहित झाले.
गावात अनेक वर्षांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यावर उपाय म्हणून लाखोंची नळ योजनेची कामे करण्यात आली आहे, पण तरीही अड्याळ ग्रामवासीयांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळेनासे झाले आहे. गावातील चहा नाश्ता, हॉटेलमध्ये हेच पाणी मोठ्या प्रमाणात वापरले जाते. यामुळेसुद्धा साथीच्या रोगांची लागण होण्याची दाट शक्यता नाकरता येत नाही.