लाक्षणिक संपाने वीज केंद्रांचे कामकाज प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 09:39 PM2019-01-07T21:39:54+5:302019-01-07T21:40:37+5:30

आपल्या विविध मागण्यांसाठी वीज कर्मचारी- अभियंत्यांनी सोमवारी पुकारलेल्या लाक्षणिक संपाने जिल्ह्यातील वीज केंद्राचे काम प्रभावित झाले. अधिकाºयांना रात्री १२ वाजतापासून कंट्रोलरुमचा ताबा घ्यावा लागल्याने त्यांची झोप उडाली. जिल्ह्यातील ९० टक्के अभियंते, कर्मचारी यात सहभागी झाले. मात्र या लाक्षणिक संपाचा सर्वसामान्य नागरिकांना कोणताही फटका बसला नाही.

Affected by the figurative power, the functioning of the power stations | लाक्षणिक संपाने वीज केंद्रांचे कामकाज प्रभावित

लाक्षणिक संपाने वीज केंद्रांचे कामकाज प्रभावित

Next
ठळक मुद्देअधिकाऱ्यांची झोप उडाली : संपाचा नागरिकांना मात्र फटका नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आपल्या विविध मागण्यांसाठी वीज कर्मचारी- अभियंत्यांनी सोमवारी पुकारलेल्या लाक्षणिक संपाने जिल्ह्यातील वीज केंद्राचे काम प्रभावित झाले. अधिकाऱ्यांना रात्री १२ वाजतापासून कंट्रोलरुमचा ताबा घ्यावा लागल्याने त्यांची झोप उडाली. जिल्ह्यातील ९० टक्के अभियंते, कर्मचारी यात सहभागी झाले. मात्र या लाक्षणिक संपाचा सर्वसामान्य नागरिकांना कोणताही फटका बसला नाही.
उर्जा उद्योगाच्या कर्मचारीविरोधी धोरणांच्या निषेधार्थ राज्य भरातील वीज कर्मचारी व अभियंत्यांनी सोमवारी १ दिवसाचा लाक्षणीक संप पुकारला होता. याला भंडारातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्य शासनाच्या अधिकारातील चारही वीज कंपन्यातील कर्मचारी, अभियंते व अधिकाऱ्यांच्या प्रलंबीत प्रश्नासंदर्भात व उर्जा उद्योगाच्या धोरणासंदर्भात कामगार संघटनेने विद्युत व्यवस्थापनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. वेळोवेळी विविध पातळीवर बैठका झाल्या. मात्र मंत्री व व्यवस्थापन पातळीवर यांच्यामध्ये होणाºया चर्चेत वाटाघाटी झाल्या होत्या. मात्र त्या चर्चेची कुठलीही अंमलबजावणी झालेली नाही. यात राज्य पातळीवरील वीज कर्मचारी व अभियंते संघटना संयुक्त कृती समितीची बैठक १३ डिसेंबरला पार पडली होती.
यात शासन आणि व्यवस्थापनाच्या संघटनेने मांडलेल्या धोरणात्मक बाबी व कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर उर्जा विभागाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करण्यात आली होती. तसेच मागण्यांची पूर्तता पूर्ण करण्याकरिता व शासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता ७ जानेवारीला २४ तासांचा राज्यव्यापी लाक्षणीक संप करण्याचाही निर्णय घेण्यात आला होता. त्याअंतर्गत भंडारा येथे मुख्य कार्यालयासमोर कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येनी उपस्थित राहून संपात सहभाग नोंदविला. तसेच मागण्यांचे निवेदन चारही कंपन्यांच्या अध्यक्षांच्या नावे पाठविले.
कर्मचारी व अभियंत्यांच्या प्रमुख मागण्याअंतर्गत, महापारेशन कंपनीतील स्टॉफ सेटअप लागू करीत असताना मंजुर पदे कमी करू नये, महावितरण कंपनीतील प्रस्तावित पुनर्रचना संघटनेने सुचविलेल्या सूचनांचा अंतर्भाव करूनच अंमलात आणावीत, शासन व व्यवस्थापनाने महावितरण कंपनीतर्फे राबविण्यात येत असलेले खाजगीकरणाचे धोरण थांबवावे, महानिर्मिती कंपनीच्या अधिकार क्षेत्रात असलेल्या लघुजल विद्युत निर्मित संचाचे शासनाने अधिग्रहण करू नये तसेच महानिर्मिती कंपनीच्या २१० मेगॉव्हॅट संच बंद करण्याचे धोरण तात्काळ थांबवावे आदी मागण्यांचा समावेश आहे.
या लाक्षणीक संपात वर्कर्स फेडरेशनचे प्रदेशाध्यक्ष नंदकिशोर भट, हरिश डायरे, सुशिल शिंदे, अखिल कुरैशी, वैशाली निपाने, सुनिता कुंजेकर, कळंबे, प्रिया तामगाडगे, भोंगाडे, पराग फटे, विलास गायधने यांच्या नेतृत्वात लाक्षणीक संप करण्यात आला.

Web Title: Affected by the figurative power, the functioning of the power stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.