तब्बल १० महिन्यानंतर भरला साकाेलीत आठवडी बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 05:00 AM2021-01-04T05:00:00+5:302021-01-04T05:00:52+5:30
लाॅकडाऊननंतर साकाेलीचा आठवडी बाजार बंद हाेता. भाजीपाला, अत्यावश्यक सेवेत येत असल्याने विक्रेत्यांना गुजरीत भाजीपाला विकण्याची परवानगी देण्यात आली हाेती. यासाठी जुन्या बाजाराची जागा आणि हाेमगार्ड परेड ग्राऊंडची जागा निश्चित करण्यात आली हाेती. त्यामुळे दाेन्ही ठिकाणी भाजी विक्री सुरू हाेती. मात्र गत आठवड्यात नगराध्यक्ष, नगरसेवक व व्यापाऱ्यांनी दर शनिवारी दुकाने बंद ठेवून रविवारी आठवडी बाजार भरविण्यात यावा, असे निवेदन मुख्याधिकारी माधवी मडावी यांना देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
साकाेली : काेराेना महासंकटामुळे बंद करण्यात आलेला साकाेलीचा आठवडी बाजार तब्बल १० महिन्यानंतर रविवारी भरविण्यात आला. पटाच्या मैदानावर भरविण्यात आलेल्या बाजारासाठी नगर परिषदेने व्यवस्था केली हाेती. सर्व भाजीविक्रेत्यांना जागेची तात्पुरती साेेय करून देण्यात आली असून त्याची नाेंदणी करण्यात आली.
लाॅकडाऊननंतर साकाेलीचा आठवडी बाजार बंद हाेता. भाजीपाला, अत्यावश्यक सेवेत येत असल्याने विक्रेत्यांना गुजरीत भाजीपाला विकण्याची परवानगी देण्यात आली हाेती. यासाठी जुन्या बाजाराची जागा आणि हाेमगार्ड परेड ग्राऊंडची जागा निश्चित करण्यात आली हाेती. त्यामुळे दाेन्ही ठिकाणी भाजी विक्री सुरू हाेती. मात्र गत आठवड्यात नगराध्यक्ष, नगरसेवक व व्यापाऱ्यांनी दर शनिवारी दुकाने बंद ठेवून रविवारी आठवडी बाजार भरविण्यात यावा, असे निवेदन मुख्याधिकारी माधवी मडावी यांना देण्यात आले.
त्या निवेदनानुसार आता दर रविवारी आठवडी बाजार सुरू करण्यात आला आहे.
साकाेलीचा आठवडी बाजार पटाच्या मैदानावर भरविण्यात येणार असला तरी दरराेज भरणारी गुजरी जुन्याच ठिकाणी भरणारृ अशी माहिती मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी दिली. विशेष म्हणजे आठवडी बाजाराच्या बाजुला मटन मार्केटसुध्दा लाॅकडाऊननंतर हटविण्यात आले हाेते. त्यामुळे आता आठवडी बाजार व मटक मार्केट एकाच ठिकाणी आल्याने साेयीचे झाले आहे.