४० वर्षानंतरही रामपुरी जलाशय दुर्लक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 05:00 AM2020-03-10T05:00:00+5:302020-03-10T05:00:32+5:30
लाखनी तालुक्याच्या पूर्व टोकावर चुलबंध नदीखोऱ्यात वनव्याप्त दुर्गम भाग म्हणून मुरमाडी तुपकर परिसराची ख्याती आहे. अत्य, अत्यल्प शेतकरी आणि दारिद्र्यरेषेखाील कुटुंबातील संख्या अधिक असल्यामुळे मागास भूभाग अशी ओळख आहे. या शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी, याकरीता १०० हेक्टर साठवण क्षमता असलेल्या जलाशयाची पाटबंधारे विभागाकडून रोहयोच्या माध्यमातून ४५ वर्षापुर्वी रामपुरी जलाशय तयार करण्यात आले. पाळीची लांबी दीड किमी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लाखनी तालुक्यातील रामपुरी जलाशयाची १९७४ मध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत निर्मिती आहे. जलाशयाच्या मालकीच्या संभ्रमातून पाटबंधारे विभागाने पाठ फिरविल्याने कालवा बांधकामासाठी खाजगी जमीन अधिग्रहित करून बांधकाम पुर्णत्वास नेले नाही. देखभाल दुरूस्तीअभावी गेट आणि सांडव्याची वाताहत झाली. त्यामुळे कोट्यवधी रूपये खर्च करूनही सिंचनाची सोय झालेली नाही. त्यामुळे नियोजित गावांमधील शेतकरी सिंचनाच्या प्रतीक्षेत आहे.
लाखनी तालुक्याच्या पूर्व टोकावर चुलबंध नदीखोऱ्यात वनव्याप्त दुर्गम भाग म्हणून मुरमाडी तुपकर परिसराची ख्याती आहे. अत्य, अत्यल्प शेतकरी आणि दारिद्र्यरेषेखाील कुटुंबातील संख्या अधिक असल्यामुळे मागास भूभाग अशी ओळख आहे. या शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी, याकरीता १०० हेक्टर साठवण क्षमता असलेल्या जलाशयाची पाटबंधारे विभागाकडून रोहयोच्या माध्यमातून ४५ वर्षापुर्वी रामपुरी जलाशय तयार करण्यात आले. पाळीची लांबी दीड किमी आहे. तत्कालीन परिस्थितीनुरूप पाटबंधारे विभागाने नियोजन करून आवश्यक त्या ठिकाणी गेट आणि सांडव्याचे बांधकाम करण्यात आले. रामपूरी जलाशयापासून मुरमाडी तुप. परिसरातील रामपूरी, सोनमाळा, डोंगरगाव, मुरमाडी, झरप, कोलारा, दिघोरी, नान्होरी, कन्हाळगाव या गावातील २५०० हेक्टर शेतीला सिंचनाची सोय करण्यात येणार होती.
पाटबंधारे विभागाच्या कालव्याच्या सर्वेक्षणानुसार शेतकºयांकडून शेतजमीन अधिग्रहीत करण्यात आली. मात्र काही भाग वनव्याप्त असल्यामुळे वनकायद्याचा अडसर तत्कालीन मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष यादवराव पडोळे यांच्या मार्फतीने दूर करण्यात आला होता.
जलाशयावरील मालकीबाबत संभ्रम
पाटबंधारे विभागाने १०० हेक्टर साठवण क्षमता असलेला जलाशय निर्माण केला असला तरी शासनाने २००८ च्या कायद्यान्वये ही क्षमता केलेले जलाशय जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाकडे हस्तांतरीत केले जाणार होते. मात्र ते करण्यात आले नाही. या जलाशयावर मालकी कुणाची हा संभ्रम असल्यामुळे आवश्यक सोयी-सुविधा निर्माण करण्यात अडचण होत आहे.
विविध बांधकाम पूर्ण होणे गरजेचे
रामपूरी जलाशयाची पाळ ४५ वर्षापूर्वी तयार करण्यात आली. त्यामुळे ठिकठिकाणी छिद्र पडून गळती लागल्याने पाणी वाहून जाते. देखभाल दुरूस्तीअभावी गेट व सांडवा नादुरूस्त आहे. नहराचे कामे अपूर्ण आहे. पाळीचे मजबुतीकरण, नवीन गेट आणि सांडवा तयार करणे तथा नहराचे बांधकाम पूर्ण होणे आवश्यक आहे. या सुविधा निर्माण झाल्यास मत्स्य व्यवसाय तथा शेतकºयांना सिंचनाचा लाभ मिळेल.