अखेर आश्वासनानंतर लाखांदुरात महिलांचे उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 09:53 PM2019-01-27T21:53:44+5:302019-01-27T21:54:06+5:30
गाव नमूना आठ नुसार आखिव पत्रिका मिळण्यात यावे याकरिता लाखांदूर येथील महिलांनी २३ जानेवारीपासून उपोषण सुरू केले होते. जोपर्यंत आमदार परिणय फुके बाळा काशिवार उपोषणस्थळी भेट देऊन मागण्या सोडविणार नाहीत तो पर्यत उपोषण सोडणार नाही, असा निर्धार उपोषणकर्त्या महिलांनी केला होता. आंदोलनकर्त्यांचा मान ठेवून दोन्ही आमदारांनी उपोषण मंडपाला भेट देऊन समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : गाव नमूना आठ नुसार आखिव पत्रिका मिळण्यात यावे याकरिता लाखांदूर येथील महिलांनी २३ जानेवारीपासून उपोषण सुरू केले होते. जोपर्यंत आमदार परिणय फुके बाळा काशिवार उपोषणस्थळी भेट देऊन मागण्या सोडविणार नाहीत तो पर्यत उपोषण सोडणार नाही, असा निर्धार उपोषणकर्त्या महिलांनी केला होता. आंदोलनकर्त्यांचा मान ठेवून दोन्ही आमदारांनी उपोषण मंडपाला भेट देऊन समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी आमदार परिणय फुके यांनी तहसीलदार महल्ले यांच्यासोबत चर्चा करून गाव नमूना आठ नुसार आखिव पत्रिका तयार करण्याबाबत चर्चा केली. त्यांनतर उपोषणकर्त्यांच्या समस्या ऐकल्या. वर्षभरामध्ये प्रक्रीया पूर्ण करुन आखिव पत्रिका देण्याचे लेखी आश्वासन महिलांना दिले.
यावेळी उपोषणावर बसलेल्या रत्नमाला धनराज गजभिये व इतर उपोषणकर्त्या महिलांना लिंबू पाणी पाजून व पुष्पहार घालून उपोषणाची सांगता करण्यात आली.
उपोषणास्थळी आमदार परिणय फुके व आमदार बाळा काशिवार बैलबंडीने यावे, असा आग्रह महिलांनी धरला होता. महिलांच्या आग्रहास्तव आमदार फुके यांनी बैलबंडीवर बसून उपोषणस्थळी पोहोचले. यावेळी दोन्ही आमदार यांच्यासोबत महामंत्री नरेश खरकाटे, विनोद ठाकरे, नुतन कांबळे, हरीश बघमारे, दिलीप चित्रिव, तहसिलदार महल्ले, पोलिस निरीक्षक मेश्राम, मुख्य अधिकारी परिहार, नगर पंचायत चे सर्व नगरसेवक, भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
वर्षभरामध्ये आखिव पत्रिका देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर उपोषणकर्त्या महिलांनी दोन्ही आमदारांचे आभार मानले.