अखेर कोका अभरण्यातील झाडे खिळेमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 10:25 PM2019-03-25T22:25:27+5:302019-03-25T22:25:41+5:30
कोका अभयारण्यातील रस्त्यांच्या कडेला असणाऱ्या झाडांना खिळे ठोकून सुमारे ४०० सूचना फलक लावण्यात आले होते. वन्यजीवांच्या भ्रमंती मार्गावर व चराई क्षेत्रात पर्यटकांना खिळे पडलेले आढळून आल्याने वन्यप्राण्यांच्या जिवीतास धोका संभवत असल्याचे वृत्त प्रकाशित होताच एकच खळबळ उडाली. अखेर कोका अभयारण्यातील सर्व झाडांवरील खिळे ठोकलेले सूचना फलक काढण्यात आले व दुसऱ्याच दिवशी दोरीने बांधण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : कोका अभयारण्यातील रस्त्यांच्या कडेला असणाऱ्या झाडांना खिळे ठोकून सुमारे ४०० सूचना फलक लावण्यात आले होते. वन्यजीवांच्या भ्रमंती मार्गावर व चराई क्षेत्रात पर्यटकांना खिळे पडलेले आढळून आल्याने वन्यप्राण्यांच्या जिवीतास धोका संभवत असल्याचे वृत्त प्रकाशित होताच एकच खळबळ उडाली. अखेर कोका अभयारण्यातील सर्व झाडांवरील खिळे ठोकलेले सूचना फलक काढण्यात आले व दुसºयाच दिवशी दोरीने बांधण्यात आले.
कोका अभयारण्यात महाशिवरात्रीच्या पूर्वी अभयारण्यातून जाणाऱ्या टेकेपार ते कोका, दुधारा ते सालेहेटी व ढिवरवाडा ते किटाळी मार्गावरील रस्त्याच्या कडेला विविध माहिती देणारे सूचना फलक झाडांना खिळ्यांनी ठोकण्यात आल्याचे दिसून आले. एका माहितीद्वारे स्थानिक वनाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यावर सोपविण्यात आली. ज्यांना विविध प्रकारचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात आले. त्यांच्याकडून हा गैरप्रकार करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
मर्यादा व प्रवेशास बंदी आदींची माहिती देणारे हे सूचना फलक असले तरी ते झाडांवर खिळ्याने ठोकणे योग्य आहे का, खिळे ठोकताना काही खिळे वन्यप्राण्यांच्या भ्रमंतीच्या व चराईच्या क्षेत्रातही पडलेले पर्यटकांना दिसून आले. झाडे हे सजीव आहेत. त्यांनाही यातना होतील, याची थोडी कल्पना वनाधिकारी यांना नाही काय, असे अनेक प्रश्न निसर्ग प्रेमींकडून विचारण्यात आले.
अखेर कोका अभयारण्याचे वनपरिक्षेत्राधिकारी सचिन जाधव यांच्या आदेशान्वये कार्यवाही करीत खिळे काढण्यात आले. झाडे खिळेमुक्त झाल्याने पर्यावरण प्रेमींकडून वनाधिकाऱ्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. त्यामुळे या घटनेने जिल्ह्यातील निसर्गपे्रेमीतून आनंद व्यक्त होत आहे.