अखेर बावनथडीचे पाणी पोहचले शेतशिवारापर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 09:53 PM2018-11-21T21:53:28+5:302018-11-21T21:53:46+5:30

केंद्र शासनाच्या योजनेत समाविष्ट असलेल्या महाराष्ट्रातील २६ प्रकल्पात सर्वप्रथम सिंचन क्षमता पूर्ण करण्याचा मान तुमसर तालुक्यातील बावनथडी प्रकल्पाला मिळाला आहे. ४३ वर्षानंतर १५ हजार ३०० हेक्टर सिंचनाचा लाभ होत आहे. घोटाळ्यांमुळे बदनाम झालेल्या विदर्भातील सिंचन प्रकल्पाचे काम बंद पडले होते. परंतु या प्रकल्पाने या सर्वांवर मात करीत सिंचन क्षमता गाठली आहे.

After all, the water of the Bawanthadi water reached to the fields | अखेर बावनथडीचे पाणी पोहचले शेतशिवारापर्यंत

अखेर बावनथडीचे पाणी पोहचले शेतशिवारापर्यंत

googlenewsNext
ठळक मुद्दे४३ वर्षांची प्रतीक्षा फळाला : १५ हजार ३०० हेक्टर शेतजमिनीचे सिंचन सुरु

मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : केंद्र शासनाच्या योजनेत समाविष्ट असलेल्या महाराष्ट्रातील २६ प्रकल्पात सर्वप्रथम सिंचन क्षमता पूर्ण करण्याचा मान तुमसर तालुक्यातील बावनथडी प्रकल्पाला मिळाला आहे. ४३ वर्षानंतर १५ हजार ३०० हेक्टर सिंचनाचा लाभ होत आहे. घोटाळ्यांमुळे बदनाम झालेल्या विदर्भातील सिंचन प्रकल्पाचे काम बंद पडले होते. परंतु या प्रकल्पाने या सर्वांवर मात करीत सिंचन क्षमता गाठली आहे.
महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमेवरील बावनथडी नदीवर १९७५ मध्ये धरण बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान वेगवर्धीत कृषीसिंचन योजनेत बावनथडी प्रकल्पाचा समावेश करण्यात आला होता. मात्र २०१० पर्यंत महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाने परवानगी दिली नाही. त्यामुळे धरण अपूर्ण राहिले. धरणाच्या लाभक्षेत्रात ७७ गावांचा समावेश आहे. धरणाचे १९९५ मध्ये नियोजन झाले. तेव्हा ११.६६ कोटींचा खर्च अपेक्षित होता. येथे पुनर्वसन, वनविभागाची मान्यता तथा भूसंपादन प्रक्रिया रेंगाळल्याने आता प्रकल्पाची किंमत ८६७.२० कोटी एवढी झाली आहे.
४३ वर्षानंतर १५ हजार ३०० हेक्टर शेतजमिनीला सिंचनाचा लाभ २०१८ मध्ये मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मुख्य अभियंता अविनाश सुर्वे, कार्यकारी अभियंता अरविंद गेडाम तथा इतर अधिकाऱ्यांच्या चमूने आव्हान स्वीकारले. केवळ तीन वर्षात १५ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली. धान उत्पादन करणाºया भंडारा जिल्ह्यातील विशेषत: तुमसर, मोहाडी तालुक्यासाठी हा प्रकल्प वरदान ठरला आहे. २००४ मध्ये प्रकल्पाचा समावेश केंद्रीय सिंचन यंत्रणेत करण्यात आला. परंतु दहा वर्षात केंद्र सरकारकडून १४९ कोटी रुपये प्रकल्पासाठी प्राप्त झाले. केंद्राचे २५ टक्के तर राज्याचे उर्वरीत १८५.७२ कोटी रुपये प्रकल्पाला प्राप्त झाले होते. शेती सरळ खरेदीने ३५१ हेक्टर पैकी ४२ हेक्टर शिल्लक असून १८ हेक्टर शेतीचा मोबदला देणे बाकी आहे. सुमारे १३ हजार हेक्टर पादचारी कामे करण्यात आली. आता या प्रकल्पाचा लाभ माडगी, चारगाव, ढोरवाडा, बोरी येथील शेतकºयांना होत आहे.

धरणातून प्रत्यक्ष सिंचनाच्या लाभासाठी ४३ वर्ष लागले. तुमसर तालुक्यातील शेतकºयांचे प्रकल्पासाठी मोठे योगदान आहे. तीन वर्षात शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाल्याने प्रकल्प पूर्णत्वास जााण्यास मदत झाली. पाटबंधारे विभागातील अधिकारी व सहकाºयांमुळे १५ हजार ३०० हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ मिळत आहे.
-अरविंद गेडाम, कार्यकारी अभियंता, बावनथडी प्रकल्प.

Web Title: After all, the water of the Bawanthadi water reached to the fields

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.