अखेर पेंढरी पुनर्वासीयांना टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 12:53 AM2019-06-03T00:53:29+5:302019-06-03T00:54:09+5:30
पेंढरी पुनर्वसनवासीयांना पिण्याचे पाणी मिळेना या वृत्ताची प्रशासनाने दखल घेतली असून गुरुवारला वृत्त प्रकाशित होताच शनिवारला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला नसला तरी भुकेल्याला मोह गोड, या म्हणीप्रमाणे पेंढरीवासीयांनी समाधान व्यक्त केले.
विशाल रणदिवे।
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : पेंढरी पुनर्वसनवासीयांना पिण्याचे पाणी मिळेना या वृत्ताची प्रशासनाने दखल घेतली असून गुरुवारला वृत्त प्रकाशित होताच शनिवारला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला नसला तरी भुकेल्याला मोह गोड, या म्हणीप्रमाणे पेंढरीवासीयांनी समाधान व्यक्त केले.
पेंढरी पुर्नवसन येथे गेला एक महिन्यापासुन पिण्याचा पाण्याचा मोठा गहन प्रश्न उपस्थित झाला होता. पिण्याचे पाणी जिथे मिळत नसणार तेथील ग्रामस्थांची मनस्थिती काय असणार? येथील ग्रामस्थ पिण्याचे पाण्यासाठी पहाटेपासूनच पाण्याचा संकलनासाठी धावपळ करायचे, या पुर्नवसन ठिकाणच्या एक ना अनेक समस्या आहेत. या सोडविण्यासाठी अनेक मोठमोठ्या नेत्यांनी तथा लोकप्रतिनिधींनी आश्वासन दिले. परंतु सर्व पालथ्या घागरीवर पाणीच! ग्रामस्थांच्या मते टँकरद्वारे आलेले पाणी हे फक्त १५ जून पावेतो पुरवठा होणार असल्याचे गावात आलेल्या काही अधिकारी कर्मचारी यांनी सांगितले असल्याचे सांगितले.
१५ जून नंतर पुन्हा ग्रामस्थांना पिण्याचा पाण्याचा शोधात जावे लागणार काय? गावात विहिर तडाला गेली, हात पंपाचे पाणी पिण्यायोग्य सहा पैकी एकाच हातपंपाचे. शासन तथा प्रशासनाने या १५ दिवसाच्या कालावधीत पेंढरी पुर्नवसन ग्रामवासींयाना मोफत पिण्याचे पाणी मिळणार अशी व्यवस्था करावी. कारण प्रत्येक कुटुंब पाणी विकत घेऊन पिण्याची क्षमता नाही. ज्या कुटुंबाची वा व्यक्तीची क्षमताच नाही त्यांच्या घरात पिण्याचे पाणी जाणार तरी कसे? असाही प्रश्न उपस्थित होतो.
१५ दिवस पिण्याचे पाणी मिळणार असले तरी यासाठी ग्रामवासींयानी शासन तथा प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आभार मानले आहे. यापुढे ग्रामवासींयाना नियमित पिण्याचा पाण्याचा पुरवठा होणार का नाही? यासाठी १५ दिवसात दुसरा पाण्याचा स्त्रोत निर्माण करणे गरजेचे आहे. हातपंपाचे पाणी पिण्यायोग्य आहे अशा ठिकाणी अधामधात बोअरवेल मशीन लावल्यामुळे गढुळ पाणी येत असल्याचे सांगण्यात आले.