स्वातंत्र्याकरिता लढणाऱ्यांची मृत्यूनंतरही उपेक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 10:39 PM2018-03-10T22:39:26+5:302018-03-10T22:39:26+5:30

After the death of the fighters for the freedom, they also ignore | स्वातंत्र्याकरिता लढणाऱ्यांची मृत्यूनंतरही उपेक्षाच

स्वातंत्र्याकरिता लढणाऱ्यांची मृत्यूनंतरही उपेक्षाच

Next
ठळक मुद्देशासकीय ईतमामाचा विसर : अंत्यसंस्कारापूर्वी देण्यात येणारी आर्थिक मदतही नाही

राहुल भुतांगे ।
आॅनलाईन लोकमत
तुमसर : भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी जिवाचे रान पेटवून देणाऱ्या तसेच स्वातंत्र्य चळवळीत गौरवास्पद कार्य व सक्रीय सहभाग नोंदविणाऱ्या स्वातंत्र्य संग्राम सेनानीचा मृत्यु झाल्यास त्यांचे अंतिम संस्कार शासकीय ईत्यामात करण्याचे आदेश आहेत. मात्र तुमसरच्या अधिकाऱ्यांना त्या आदेशाचा विसर पडल्याने त्या विर स्वातंत्र्य संग्राम सेनानीचे अंतिम संस्कार करून स्वातंत्र्याकरिता लढणाऱ्या त्या विरांच्या मृत्युनंतर उपेक्षा झालयाचा प्रकार घडला.
विश्वनाथ नत्थू भाजीपाले असे त्या वीर स्वातंत्र्य संग्राम सेनानीचे नाव आहे. त्यांचा जन्म २० सप्टेंबर १९३० साली झाला. सन १९४२ च्या चले जाव चळवळीत इंग्रजांनी त्यांच्या पायावर गोळी झाळून जखमी केल ेहोते व त्यानंतर त्यांना ११ महिने ११ दिवसाचा कारावास मध्यवर्ती कारागृह भंडारा येथे भोगावा लागला होता. त्या गौरवास्पद कार्याची दखल घेत सन १९७२ मध्ये तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या हस्ते तामप्रपत्र ही देण्यात आले होते.
तेव्हापासूनच त्यांना पेन्शन व सर्व शासकीय सुविधांचा लाभ मिळत होता. दरम्यान ३ मार्च २०१८ रोजी त्यांचा वृद्धापकाळाने सायंकाळी ७.३० वाजता मृत्यू झाला असता वडील स्वातंत्र्य संग्राम सेनानी असल्यामुळे त्यांच्या मुलाने तहसिल कार्यालयात माहिती देण्यासाठी दुरध्वनी केला. मात्र एकदाही फोन उचलण्यात आले नसल्याने त्यांनी तलाठीला माहिती दिली तेव्हा कुठेतरी दुसºया दिवसी अंतिम संस्काराला नेत्यावेळी शासनाचा प्रतिनिधी म्हणून कार्यालयातील एका कर्मचाºयाला पाठविण्यात आले. तेव्हा पोलीस अधिकारी असे एक एकच आले व पुष्पचक्र घालून निघून गेलेत. परंतू त्या विर सेनानीच्या शवाला तिरंग्यात गुंडाळण्याचे ते विसरले इतकेच नव्हे तर अंतिम संस्कारापुर्वी परिवाराला देण्यात येणारी आर्थिक मदत दिली नाही. ईतकेच नव्हे तर ज्यावेळी विर स्वातंत्र्य संग्राम सेनानी विश्वनाथ भाजीपाले यांचा पार्थिव हुतात्मा स्मारकाजवळ आणण्यात आले. त्यावेळी एकही पोलीस तिथे नव्हता. स्वातंत्र्य लढ्यात जिवाचे राण करणाºयांच्या पार्थिवावर गोळ्या झाडून सलामी दिली नाही तरी चालले असते मात्र त्यांचा पार्थिवावर तिरंगा गुंडाळला असता व त्यांच्या सम्मानात दोन चार पोलीस येवून श्रद्धांजली दिली असती तरी पुरेशे होते मात्र अशा प्रकारची अवमानना करण्याचा प्रकार पहिलांदाच तुमसरात घडला, असा प्रकार इतर स्वातंत्र्य संग्राम सेनानीशी घडू नये व दोषीवर कारवाई व्हावी याकरिता विश्वनाथ भाजीपाले यांच्या कुटुंबियांनी पत्रपरिषदेत मागणी केली आहे. यावेळी विजय विश्वनाथ भाजीपाले, प्रविण पाटील, कला पाटील, शिला देशमुख, भाष्कर देशमुख उपस्थित होते.

Web Title: After the death of the fighters for the freedom, they also ignore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.