गांधीनंतर आंबेडकर व लोहिया देशाचे महान सुपुत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:01 AM2019-08-29T00:01:03+5:302019-08-29T00:01:44+5:30
राष्ट्रप्रेम, सर्व घटकांविषयी सहानुभूती, मानवी मुल्याची प्रतिष्ठापना आणि अविरत कार्यशिलता यांचा विचार करता प्रतीभा आणि मौलिकतेचे धनी असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोहिया भारताचे महान सुपूत्र होय, असे प्रतिपादन जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे सेवानिवृत्त प्रोफेसर डॉ. आनंदकुमार यांनी येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व डॉ. राममनोहर लोहिया यांचे नवभारताच्या उभारणीत महत्वपूर्ण योगदान होते. परंतु त्यांचे विचार व महत्व समजू शकले नाही. त्यांची नेहमीच उपेक्षा केल्या गेली. राष्ट्रप्रेम, सर्व घटकांविषयी सहानुभूती, मानवी मुल्याची प्रतिष्ठापना आणि अविरत कार्यशिलता यांचा विचार करता प्रतीभा आणि मौलिकतेचे धनी असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोहिया भारताचे महान सुपूत्र होय, असे प्रतिपादन जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे सेवानिवृत्त प्रोफेसर डॉ. आनंदकुमार यांनी येथे केले.
भारत-तिबेट मैत्रीसंघ व सार्वजनिक वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर व डॉ. राममनोहर लोहिया : एक दृष्टिक्षेप’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी होते.
यावेळी अमृत बन्सोड, कवी प्रमोदकुमार अणेराव, सचिन रामटेके उपस्थित होते. प्रो. डॉ. आनंदकुमार म्हणाले, सामाजिक व्यवस्था परिवर्तनाबाबत डॉ. आंबेडकर व लोहिया यांच्या मुलभूत विचारसरणीत खास फरक नाही. फक्त काळ आणि प्रासंगिकता इतकेच अंतर आहे. आज त्यांच्या अनुयायांनी याचा विचार करून या दोन्ही महापुरूषांच्या विचारांची समन्वयीत ज्योत पुढे नेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
भारताने चीन ऐवजी तिबेटला मान्यता द्यावी, अशी डॉ. आंबेडकर व डॉ. लोहिया यांनी भारत सरकारला सूचना केली होती. हे दोघेही तिबेटचे खंदे समर्थक होते, असे त्यांनी सांगितले.
संचालन भारत-तिबेट मैत्री संघाचे जिल्हा सचिव प्रा. मोरेश्वर गेडाम यांनी तर प्रास्ताविक अमृत बन्सोड यांनी व आभार गुलशन गजभिये यांनी मानले. यावेळी अॅड. जयंत आठवले, महादेव मेश्राम, डी.एफ. कोचे, अॅड. डी.के. वानखेडे, आहुजा डोंगरे, एम.डब्ल्यु. दहिवले, आदिनाथ नागदेवे, अर्जुन गोडबोले आदी उपस्थित होते.