महिनाभरानंतर मिरची, वांग्याचे भाव पुन्हा सावरले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 05:00 AM2020-12-30T05:00:00+5:302020-12-30T05:00:56+5:30
पालांदूर मंडल कृषी कार्यालयांतर्गत १६६ हेक्टरवर भाजीपाल्याची लागवड केलेली आहे. चुलबंद खोऱ्यातील शेतकरी शेतीत सर्वच पीक घेतात. सुमारे २०० हेक्टर पर्यंत मक्याची लागवड नियोजित आहे. ११९० हेक्टर उन्हाळी धानाचा हंगाम आहे. तर काही हेक्टरवर कडधान्याची लागवड आटोपलेली आहे. खरिपाचा हंगाम शेवटच्या टोकाला असून मळणी संपल्या सारखीच आहे. मात्र धान खरेदी केंद्रावर धान विक्रीच्या दीर्घ प्रतीक्षेत आहेत. प्रत्येक धान खरेदी केंद्रावर त्याच्या कार्यक्षमतेने नुसार सुमारे २० हजार क्विंटल पर्यंत धानाची खरेदी आटोपलेली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : डिसेंबर महिन्याचे आरंभापासून भाजीपाल्याचे दर सुमार घसरलेले होते. यामुळे शेतकरी वर्गाचा बाजारात नेण्याचा खर्चसुद्धा निघणे कठीण होता. परंतु गत आठ दिवसाच्या ढगाळ वातावरणामुळे भाजीपाल्याची आवकवर परिणाम झाल्याने व मागणी कायम असल्याने वांगे व मिरची च्या दरात बर्यापैकी भाव वाढ झालेली आहे.
पालांदूर मंडल कृषी कार्यालयांतर्गत १६६ हेक्टरवर भाजीपाल्याची लागवड केलेली आहे. चुलबंद खोऱ्यातील शेतकरी शेतीत सर्वच पीक घेतात. सुमारे २०० हेक्टर पर्यंत मक्याची लागवड नियोजित आहे. ११९० हेक्टर उन्हाळी धानाचा हंगाम आहे. तर काही हेक्टरवर कडधान्याची लागवड आटोपलेली आहे. खरिपाचा हंगाम शेवटच्या टोकाला असून मळणी संपल्या सारखीच आहे. मात्र धान खरेदी केंद्रावर धान विक्रीच्या दीर्घ प्रतीक्षेत आहेत. प्रत्येक धान खरेदी केंद्रावर त्याच्या कार्यक्षमतेने नुसार सुमारे २० हजार क्विंटल पर्यंत धानाची खरेदी आटोपलेली आहे.
पहिल्या टप्प्यातील धानाचा निधी आला असून दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा कायम आहे. ३१ मार्च २०२१ पर्यंत धान मोजणी चा अंतिम मुहूर्त ठरलेला आहे. यातून सुटका मिळावी व दररोज नगदी रुपये हातात यावे या दूरदृष्टीने चुलबंद खोऱ्यातील शेतकरी सुमार प्रगतीवर आहे.
बागायती शेतीत वांगे ,मिरची यांचे दर बऱ्यापैकी सरसावलेले आहेत. शनिवारी आठवडी बाजारात वांगे चिल्लर भावात चाळीस रुपये किलोच्या दराने तर मिरची ४० ते ५० रुपये दराने विकल्या गेली. हा दर कायम राहिल्यास बागायतदारांना अधिक नफ्याची आशा देणारा ठरणार आहे.
मिरची चा व्यापारी हा सुद्धा हायटेक झाला आहे. बीटीबी मुळे व्यापारी वर्गात खरेदी करता स्पर्धा तयार झाली असून यामुळे शेतकरी वर्गाला निश्चितच फायदा होत आहे.
भाजीपाल्यात सुमार प्रगती साधली आहे. कृषी विभागाने पुरविलेल्या टिंबक व मल्चिंगचे अद्यावत ज्ञान व त्यात शेतकऱ्यांना मिळालेले अनुदान हेसुद्धा भाजीपाल्याच्या उत्पादनाकरिता प्रेरक ठरलेले आहेत.
खोलमारा येथे भाजीपाला पिकांत वाढ
लाखांदूर तालुक्यातील चुलबंद काठावरील पालांदूर शेजारील खोलमारा या गावात प्रत्येक घरात भाजीपाल्याची शेती होत आहे. कारले व चवळी (शेंगा) यांचे उत्पादन अख्ख्या जिल्ह्यात परिचित आहेत. गावचे सरपंच अमृत मदनकर यांनी गावाला योग्य दिशा देत घराघरात प्रगतशील शेतकरी तयार केलेला आहे. पालांदूर येथे बारमाही भाजी उत्पादक देवराम तलमले, मोहन लांजेवार, धनपाल नदुरकर, प्रकाश नंदुरकर, रमाबाई लांजेवार, सुखदेव भुसारी, विश्वास राऊत, रीना राऊत, सतीश भुसारी, मनोहर भुसारी, धनश्याम लांजेवार, हेमराज भुसारी, अभिमान भुसारी, टिकाराम भुसारी, गजानन भुसारी, अरुण पडोळे, प्रशांत खागर आदी शेतकरी पालांदूरला ताजा भाजीपाला पुरवतात. यांच्या सेवेत पालांदूर येथील कृषी मित्र शरद निखाडे, प्रशांत जांभुळकर, गजानन हटवार, नरेंद्र खंडाईत व मंडळ कृषी कार्यालय नेहमी तत्पर असतात.
पांढरा वांगा उत्पादित असून त्याला प्रति किलोला ४० रुपयेचा प्रति किलो दर शनिवारी आठवडी बाजारात मिळालेला आहे. पांढरा वांगा ला खूप मोठी मागणी आहे. पांढरा वांगा ही पालांदूरची भाजीपाल्याची जुनी ओळख आजही कायम आहे.
- सतिश भुसारी, बागायतदार पालांदुर.