जुने एटीएम बाद, ग्राहकांची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 09:56 PM2019-01-03T21:56:02+5:302019-01-03T21:56:33+5:30

रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार सर्वच बँकानी जुने एटीएम कार्ड बाद केले असून शेकडो ग्राहकांना अद्यापही मायक्रोचिप असलेले नवीन कार्ड मिळालेच नाही. परिणामी एटीएममधून पैसे काढता येत नसल्याने अनेकांचे व्यवहार खोळंबले आहेत. यातून सर्वसामान्यांची कोंडी होत आहे. भंडारा शहरातील अनेक ग्राहक बँकामध्ये जाऊन चौकशी करीत आहेत.

After the old ATM, the customer's closure | जुने एटीएम बाद, ग्राहकांची कोंडी

जुने एटीएम बाद, ग्राहकांची कोंडी

Next
ठळक मुद्देव्यवहार खोळंबले : बँक अधिकारी नेत आहेत वेळ मारुन

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार सर्वच बँकानी जुने एटीएम कार्ड बाद केले असून शेकडो ग्राहकांना अद्यापही मायक्रोचिप असलेले नवीन कार्ड मिळालेच नाही. परिणामी एटीएममधून पैसे काढता येत नसल्याने अनेकांचे व्यवहार खोळंबले आहेत. यातून सर्वसामान्यांची कोंडी होत आहे. भंडारा शहरातील अनेक ग्राहक बँकामध्ये जाऊन चौकशी करीत आहेत. मात्र बँकेचे अधिकारी हात वर करीत असल्याचे दिसत आहे.
सुरक्षेच्या कारणावरुन सर्वच बँकाचे जुने एटीएम कार्ड बदलविण्याचा सपाटा सुरु आहे. एटीएम कार्डच्या दर्शनी भागाला मायक्रोचीप (ग्रीन पिन) असलेले नवीन कार्ड दिले जात आहे. मात्र शेकडो ग्राहकांना अद्यापही नवीन एटीएम कार्ड प्राप्त झाले नाही. त्यामुळे ३१ डिसेंबरनंतर जुने कार्ड ब्लॉक झाल्याने पैसे काढतांना अनेकांची अडचण होत आहे. एटीएमवर गेल्यावर व्यवहार करतांना पैसे निघण्याऐवजी वेगवेगळे संदेश येत आहेत. नवीन कार्डची माहिती नसलेल्या ग्राहकांना हा काय प्रकार आहे हे समजत नाही. वेगवेगळे एटीएम फिरुन पैसे काढण्याचा प्रयत्न केला जातो. शेवटी नवीन कार्डचा प्रकार त्यांना माहित होते. परंतु घरी कार्ड न आल्याने आता पैसे काढावे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नवे एटीएम कार्ड अद्याप आले नाही असे ग्राहक बँकेत जाऊन विचारणा करीत आहेत. परंतु तेथील यंत्रणा थेट हात वर करीत आहेत. ग्राहकांना पोस्ट, कुरिअरमध्ये जाण्याचा सल्ला दिला जातो. राष्ट्रीयकृत बँकाबाबत ही ओरड आहे. लवकरच एटीएम येईल असे ठेवणीतील उत्तर देऊन वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला जातो.
अनेक ग्राहकांचे एटीएम कार्ड त्यांच्यापर्यंत पोहचले नाही. बँकात चौकशी केली तर कुरिअर अथवा पोस्टाने पाठविल्याचे सांगितले जात आहे. नवीन वर्षापासून प्रत्येक एटीएम कार्डधारक नवीन एटीएमसाठी बँकेचे उंबरठे झिजवित आहे. परंतु या ग्राहकांना योग्य मार्गदर्शन केले जात नाही. नवीन कार्ड आले नसल्याने अनेक ग्राहकांची आर्थिक कोंडी झाली आहे. उसणवार करुन व्यवहार भागविले जात आहे. याबाबत बँकानी सविस्तर खुलासा करावा अशी मागणी होत आहे. एटीएम कार्ड हे आता बँक व्यवहारासाठी सर्वत्र वापरले जाते. शहरी आणि ग्रामीण भागातील प्रत्येक बँक खातेधारकाकडे कार्ड आहे. बँकेत जाऊन रांगेत राहण्याचा त्रास वाचून झटपट पैसे मिळत असल्याने सर्वच जण कार्डचा वापर करीत आहे. परंतु जुने कार्ड बंद झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे.

गोपनीयतेच्या सुरक्षेला धोका
अनेक ग्राहकांना नवीन एटीएम कार्ड आले आहे. सदर कार्ड अ‍ॅक्टीव्हेट करण्यासाठी एटीएमवर जावे लागते. त्याठिकाणी कार्ड मशीनमध्ये टाकल्यानंतर येणाऱ्या सुचनाचे पालन करावे लागते. परंतु अनेक ग्राहकांना नवीन कार्ड एक्टीव कसे करावे याची माहिती नसते. त्यामुळे ते या परिसरात असलेल्या व्यक्तींचा आधार घेतात. त्यातून एटीएम पिनच्या सुरक्षेचा धोका निर्माण होतो. तसेच एटीएम कार्ड बंद झाल्याचे फोन येऊन त्यावरूनही नागरिकांना आपल्या अकाउंटची माहिती विचारण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा फोनवर कुणालाही माहिती देऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे. यातून भविष्यात ग्राहकाच्या खात्यातील पैसे वळते होण्याची भीती आहे. त्यामुळे ग्राहकांनी नवीन कार्ड अ‍ॅक्टीव्हेट करतांना काळजी घेणे गरजेचे आहे. अनेकदा कार्ड अ‍ॅक्टीव्हेट करतांना चुकीची कमांड दिल्याने कार्ड ब्लॉक झाल्याचे प्रकारही पुढे येत आहे. ही मंडळी पुन्हा बँकेत धाव घेत आहे.

Web Title: After the old ATM, the customer's closure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.