सात दशकानंतर धावली तिरोडी-कटंगी मार्गावर मालगाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:06 AM2021-03-04T05:06:54+5:302021-03-04T05:06:54+5:30
तुमसर- तिरोडी दरम्यान ब्रिटिशकालीन रेल्वेलाईन आहे. तिरोडीच्या पुढे कटंगीपर्यंत रेल्वे रूळ नव्हते. गत वीस वर्षापासून रेल्वे ट्रॅक तयार ...
तुमसर- तिरोडी दरम्यान ब्रिटिशकालीन रेल्वेलाईन आहे. तिरोडीच्या पुढे कटंगीपर्यंत रेल्वे रूळ नव्हते. गत वीस वर्षापासून रेल्वे ट्रॅक तयार करण्याची मागणी होती. ती आता पूर्ण करण्यात आली असून या ट्रॅकवर गिट्टी घालण्याचे काम सुरू आहे. ३१ मार्चपर्यंत ही संपूर्ण कामे पूर्ण होऊन रेल्वे ट्रॅक वाहतुकीस खुला होणार आहे.
तुमसर-तिरोडी दरम्यान ब्रिटिशांनी मॅगनीज वाहतुकीसाठी रेल्वे ट्रॅक तयार केला होता. या परिसरात चिखला, डोंगरी बुज., तिरोडी येथे ब्रिटिशांनी मॅगनीज खाणी सुरू केल्या होत्या. या रेल्वे मार्गावर सध्या प्रवासी रेल्वेगाड्या धावतात. तिरोडा ते कटंगी दरम्यान रेल्वे ट्रॅक नव्हता. त्यामुळे मध्य भारतात जाता येत नव्हते. कटंगी ते बालाघाट रेल्वे मार्ग आहे. कटनीपर्यंत रेल्वे ट्रॅक पूर्ण झाल्याने थेट प्रवासी गाडी व मालगाड्या जाण्यास सुविधा झाली आहे. २८ फेब्रुवारी रोजी सर्वप्रथम या मार्गावर मालगाडी धावली. ३१ मार्चपर्यंत गिट्टी घालण्याचे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर या मार्गावर प्रवासी व मालगाड्या धावणार असल्याचे सांगण्यात येते. पहिली मालगाडी चालविण्याचा मान चालक महेश कुमार देवानी, शेखर ठाकूर, परिचालक डी. के. खरे यांना मिळाला.