१७ हजार व्यक्तींच्या चाचणीनंतर केवळ १९ पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:37 AM2021-07-27T04:37:22+5:302021-07-27T04:37:22+5:30
बाॅक्स ४ वाजेनंतरही बाजारपेठ उघडीच काेराेना संसर्ग कमी झाला असला तरी तिसऱ्या लाटेचा धाेका कायम आहे. शासनाने काही निर्बंध ...
बाॅक्स
४ वाजेनंतरही बाजारपेठ उघडीच
काेराेना संसर्ग कमी झाला असला तरी तिसऱ्या लाटेचा धाेका कायम आहे. शासनाने काही निर्बंध घालून दिले आहेत. बाजारपेठेच्या वेळाही ठरवून दिल्या आहेत. सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत बाजारपेठ उघडी ठेवण्यास परवानगी आहे. परंतु गत १५ दिवसांपासून अनेक दुकाने सायंकाळपर्यंत उघडी राहत असल्याचे दिसून येत आहे. बाजारात मास्क न घालता फिरणाऱ्यांची संख्याही माेठी आहे. काेराेना संसर्ग कमी झाल्याने नागरिकांच्या मनातील भीती कमी झाली. परंतु संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र त्याचाच भंडारा शहरातील नागरिकांना विसर पडला आहे.
बाॅक्स
नाकावरून मास्क घसरला हनुवटीवर
काेराेना संसर्गाच्या काळात प्रत्येकजण मास्क लावूनच बाहेर निघताना दिसत हाेता. काेराेनाच्या भीतीसाेबत दंडाचीही दहशत हाेती. त्यामुळे नागरिक मास्क आठवणीने लावत हाेते. परंतु आता नागरिक मास्क लावतात; परंतु नाकाऐवजी ताे हनुवटीला लावलेला असताे. कुणी म्हटलेच तर नाकावर मास्क ओढला जाताे. शासकीय कार्यालय असाे की बाजारपेठ सर्वच ठिकाणी नाकावरून मास्क हनुटीवर घसरल्याचे चित्र आहे.