साडेतीन वर्षांनंतर तुमसर शहरातील घरकुल लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:36 AM2021-09-19T04:36:10+5:302021-09-19T04:36:10+5:30
कोट श्रेय कोण कोणत्या पद्धतीने लुटतो हे महत्त्वाचे नसून लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळणे हे महत्त्वाचे आहे. केंद्र सरकार ...
कोट
श्रेय कोण कोणत्या पद्धतीने लुटतो हे महत्त्वाचे नसून लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळणे हे महत्त्वाचे आहे. केंद्र सरकार पुरस्कृत आवास योजने संदर्भात राज्य सरकारची आर्थिक कर्तव्ये समाधानकारक नसल्याने लाभार्थ्यांना एवढे दिवस त्रास झाला. मात्र आता ४ ते ५ दिवसांत प्राप्त निधी लाभार्थ्यांना देय केली जाणार याचे आनंद आहे.
प्रदीप पडोळे, नगराध्यक्ष नगर परिषद, तुमसर
कोट
स्वतःचे अपयश लपविण्यासाठी राज्य शासनावर ताशिरे ओढणे योग्य नाही. याअगोदर यांनी आंदोलने केली होती. मग त्यावेळी निधी का मिळाला नाही. आताच निधी कसे काय मिळाले अजूनपर्यंत तुमसर नगर परिषदेने संपूर्ण कागदपत्रे जमाच केले नसल्याचे उघड झाले आहे. असो गोरगरीब लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होत असल्याचा आनंद आहे. यात श्रेय घेण्याचे कोणतेही कारण नाही. आता नगराध्यक्ष ने उर्वरित निधी ही लाभार्थ्यांना तत्काळ मिळवून द्यावा हीच अपेक्षा आहे.
अभिषेक कारेमोरे, माजी नगराध्यक्ष, तुमसर