वर्षभरानंतर मिळाले जिल्हा ग्राहक मंचाला अध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 10:37 PM2018-08-29T22:37:36+5:302018-08-29T22:37:51+5:30

उद्योजक, व्यापारी यांच्यासह अन्य व्यवहारांमध्ये फसवणूक झालेल्या नागरिकांना न्याय मागण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे धाव घ्यावी लागते. मात्र भंडारा येथे वर्षभरापासून जिल्हा ग्राहक तक्रार मंचच्या न्यायव्यवस्थेत अध्यक्षपद रिक्त होते. परिणामी, ग्राहकांना ‘तारीख पे तारीख’ देण्यात येत होते. अखेर राज्य शासनाने अध्यक्षपदी दिलीपकुमार दुदलाजी देशमुख यांची नियुक्ती केली आहे. लवकरच ते अध्यक्षपदाची सूत्रे सांभाळतील, अशी अपेक्षा आहे.

After the year, the District Consumer Manch Chairman | वर्षभरानंतर मिळाले जिल्हा ग्राहक मंचाला अध्यक्ष

वर्षभरानंतर मिळाले जिल्हा ग्राहक मंचाला अध्यक्ष

googlenewsNext
ठळक मुद्देतक्रारींच्या निपटाऱ्याला येणार वेग : अध्यक्षपदी दिलीपकुमार देशमुख यांची वर्णी

देवानंद नंदेश्वर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : उद्योजक, व्यापारी यांच्यासह अन्य व्यवहारांमध्ये फसवणूक झालेल्या नागरिकांना न्याय मागण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे धाव घ्यावी लागते. मात्र भंडारा येथे वर्षभरापासून जिल्हा ग्राहक तक्रार मंचच्या न्यायव्यवस्थेत अध्यक्षपद रिक्त होते. परिणामी, ग्राहकांना ‘तारीख पे तारीख’ देण्यात येत होते. अखेर राज्य शासनाने अध्यक्षपदी दिलीपकुमार दुदलाजी देशमुख यांची नियुक्ती केली आहे. लवकरच ते अध्यक्षपदाची सूत्रे सांभाळतील, अशी अपेक्षा आहे.
भंडारा जिल्हा तक्रार निवारण मंचात ८ जुलै २०१६ ते १४ जुलै २०१७ या काळात अध्यक्ष म्हणून ए.जी. चिलबुले यांनी कार्यभार सांभाळला त्यानंतर पासून मंचला अध्यक्ष नसल्यामुळे अनेक प्रकरणे पडून होते. त्यानंतर १६ जुलै २०१८ पासून आजपर्यत प्रभारी अध्यक्ष म्हणून भास्कर डी. योगी कार्यभार सांभाळत आहेत. वर्षभरापासून स्थायी अध्यक्ष नसल्यामुळे महावितरण कंपनी, उत्पादक कंपनी, बँक, बांधकाम व्यावसायिक व शेती व्यवसायामध्ये विविध कंपन्यांनी दिलेल्या बिलांमधून अनेकांची फसवणूक झालेली आहे. त्यामुळे शेकडो ग्राहकांनी विविध कारणास्तव ग्राहक मंचामध्ये धाव घेतली आहे. परंतू स्थायी अध्यक्ष नसल्यामुळे न्याय मागण्यासाठी अडचण निर्माण झाली होती. सध्या स्थितीत येथील कारभार प्रभारी अध्यक्षांच्या खांद्यावर आहे. गणेशपूर मार्गावर निवारण मंचची प्रशस्त ईमारत आहे. या कार्यालयात अनेक कर्मचारी कार्यरत आहेत. या कार्यालयावर शासनाचा ५० ते ६० लाख रूपये वार्षिक खर्च होतो. परंतू अलिकडे येथे अनेक पद रिक्त असल्यामुळे कामाचा ताण वाढलेला दिसून येतो. राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने नुकताच एक निर्णय काढून भंडारा येथील ग्राहक तक्रार निवारण मंच अध्यक्षपदी दिलीपकुमार दुदलाजी देशमुख यांची नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती शपथपत्र व हमीपत्र राज्य आयोगाला सादर केल्यानंतर व त्यांनी त्यांच्या पदाचा प्रत्यक्षात पदभार स्वीकारल्यानंतर प्रभावी होणार आहे. ग्राहक संरक्षण कायद्याच्या तरतुदीनुसार मंचाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर आता त्यांच्या येण्याची प्रतीक्षा आहे.

Web Title: After the year, the District Consumer Manch Chairman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.