वय वर्षे ५६, अन् रक्तदान ६७ वेळा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:24 AM2021-06-17T04:24:36+5:302021-06-17T04:24:36+5:30
रक्तदानाने गरजू व्यक्तीचे प्राण वाचवले जाऊ शकतात ही संकल्पना घेतलेल्या दिलीप कुकडे यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ...
रक्तदानाने गरजू व्यक्तीचे प्राण वाचवले जाऊ शकतात ही संकल्पना घेतलेल्या दिलीप कुकडे यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना १९९२ या वर्षी पहिल्यांदा रक्तदान केले होते. गडचिरोली जिल्हा रुग्णालयात नोकरीत होते. त्यावेळी रुग्णालयात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्याची पत्नी मृत्यूच्या दारात उभी होती. तिच्या गर्भाशयाचे ऑपरेशन करताना रक्ताची नितांत आवश्यकता होती. अशा वेळी दिलीप कुकडे रक्त देण्यासाठी पुढे आले. त्यानंतर त्या कर्मचाऱ्यांची पत्नी बचावली. तिथून कुकडे यांना रक्तदानाची अधिक प्रेरणा मिळाली. तेव्हापासून अव्याहतपणे जून मधील जन्म दिवस व फेब्रुवारी महिन्यातील लग्नाच्या अविस्मरणीय दिवशी दिलीप कुकडे व कधी त्यांची पत्नी रक्तदान करून वाढदिवस आनंद दिवस म्हणून साजरा करतात.
बॉक्स
डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे रक्तदान
जिल्हा सामान्य रुग्णालयातील १८ डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी रक्तदान करण्यासाठी पुढे येऊन जागतिक आरोग्य दिवस साजरा केला. यावेळी डॉ. मीरा सोनवणे, सुरभी चित्रिवेलकर, डॉ. कल्याणी मोहतुरे , डॉ. तेजल मोटघरे ,डॉ. हणमंत गुट्टे, निखिल हरकंडे, डॉ. पंकज कटोरे, अंकित श्यामकुवार, विपुल मडावी, डॉ. प्रवीण सावरबांधे, बबन मनतुटे, मधुर रागोर्ते, अजित कुर्जेकर, वासुदेव तुरंगकर, उमेश गहाणे, विशाल तंतपडे, चेतन मोटघरे, जागेश्वर बांगडकर यांनी रक्तदान केले.
===Photopath===
160621\img-20210614-wa0029.jpg
===Caption===
उजवीकडे असलेले दिलीप कुकडे रक्तदान करताना