नवोदयच्या आंदोलनाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 09:47 PM2018-08-31T21:47:56+5:302018-08-31T21:48:13+5:30
भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या नवोदय विद्यालय प्रशासनाने प्रवेश परीक्षेचा निकाल घोषित केला असून जिल्ह्यातील ४० विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. यामुळे नवोदय विद्यालयासाठी गत २४ दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाची सांगता झाली. विद्यार्थ्यांच्या हातून शरबत ग्रहन करून उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी कायमस्वरूपी जागेसाठी जिल्हा प्रशासनातर्फे मंत्रालयात प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करण्याचे ठरविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या नवोदय विद्यालय प्रशासनाने प्रवेश परीक्षेचा निकाल घोषित केला असून जिल्ह्यातील ४० विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. यामुळे नवोदय विद्यालयासाठी गत २४ दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाची सांगता झाली. विद्यार्थ्यांच्या हातून शरबत ग्रहन करून उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी कायमस्वरूपी जागेसाठी जिल्हा प्रशासनातर्फे मंत्रालयात प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करण्याचे ठरविण्यात आले.
नवोदय विद्यालयातील समस्या आणि प्रवेश परीक्षेचा निकाल घोषित करावा, या मागणीसाठी ९ आॅगस्टपासून येथील जिल्हा कचेरीसमोर उपोषण करण्यात आले होते. सहाव्या वर्गातील प्रवेशासाठी तब्बल दोन महिने उशिराने हा निकाल घोषित झाला. या कालावधीत विद्यार्थ्यांचे झालेल्या नुकसानीस जबाबदार कोण, असा सवाल करीत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी समिती नेमावी, अशी मागणी आंदोलक व नागपूर विद्यापीठाचे पदवीधर मतदार संघ, सिनेट सदस्य प्रविण उदापुरे यांनी केली आहे.
या आंदोलनात पालकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. दरम्यान प्रशासनाने निकाल घोषित केल्यानंतर २४ व्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हातून उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी पालक प्रतिनिधी भाऊ कातोरे, विलास मयारकर, प्रविण उदापुरे, मंगेश वंजारी, उमेश मोहतुरे, शालिनी झोडे, योगिता लांजेवार, नरेश डहारे, सुभाष आजबले, विरू फुंडे, आकाश थानथराटे, प्रेम वनवे, प्रमोद भांडारकर, पन्ना सार्वे, यशवंत भोयर, सचिन घनमारे, नितीन तुमाने, दिनेश ठवकर, मनोज बोरकर, शैलेश साऊसाखरे, यशवंत टिचकुले, बालु ठवकर, संजय मते, संजय बांते, गजेंद्र सेलोकर, सुहास गजभिये तसेच विद्यार्थी अनुग्रह मोरकुटे, हितांशु कांबळे, अंश देवगडे, विश्वास लाऊत्रे आदी उपस्थित होते.