खासगीकरणाच्या विरोधात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 01:07 AM2019-07-29T01:07:57+5:302019-07-29T01:08:22+5:30
देशातील संरक्षण उत्पादन करणाऱ्या आयुध निर्माणीमध्ये खासगीकरण करणार असल्यामुळे देशाची सुरक्षा धोक्यात येणार आहे. याचा परिणाम म्हणून देशातील मान्यताप्राप्त कामगार संघटनांनी आयुध निर्माणीचे मुख्य महाप्रबंधक षणमुगम व प्रशासकीय अधिकारी डॉ.प्रवीण महाजन यांच्याद्वारे पंतप्रधानांना निवेदन दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : देशातील संरक्षण उत्पादन करणाऱ्या आयुध निर्माणीमध्ये खासगीकरण करणार असल्यामुळे देशाची सुरक्षा धोक्यात येणार आहे. याचा परिणाम म्हणून देशातील मान्यताप्राप्त कामगार संघटनांनी आयुध निर्माणीचे मुख्य महाप्रबंधक षणमुगम व प्रशासकीय अधिकारी डॉ.प्रवीण महाजन यांच्याद्वारे पंतप्रधानांना निवेदन दिले. खासगीकरण मागे न घेतल्यास २० आॅगस्ट पासून देशव्यापी बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
भारताचे संरक्षण व औद्योगिक उत्पादन देशातील अग्रणी समजली जाणारी आयुध निर्माणी येथे मूल भारतीय कामगारांच्यातर्फे करण्यात येते. मात्र आजघडीला विद्यमान केंद्र सरकारने शंभर टक्के एफडीआय गुंतवणूक करण्याचे खुले निवेदन जाहीर केले. त्यानुसार आता संरक्षण उत्पादन व सामुग्री ही खासगीकरण करून देशाची सुरक्षा धोक्यात येत आहे.
सदर केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात देशातील आयुध निर्माणीसमोर धरणे आंदोलन, गेट मिटींग, रॅलीद्वारे केंद्र सरकारला खासगीकरण थांबविण्याची विनंती करण्यात आली. मात्र केंद्र सरकारने कसल्याही प्रकारची हालचाल केल्याचे दिसून आलेले नाही. परिणामी देशातील मान्यताप्राप्त कामगार संघटना यात आयुध निर्र्माणी भंडारा, जवाहरनगर येथील आयुध कर्मचारी संघ, न्यू एक्सप्लोसीव फॅक्टरी युनियन, आॅर्डनन्स फॅक्टरी एम्लाईज युनियन, डेमोक्रेटिक मजदूर युनियनच्या पदाधिकारी व सदस्यांनी पंतप्रधानांना आयुध निर्माणीचे मुख्य महाप्रबंधक षणमुगम व प्रशासन अपर महाप्रबंधक डॉ.प्रवीण महाजन यांच्याद्वारे निवेदन पाठविण्यात आले. खासगीकरण मागे न घेतल्यास देशातील ४१ आयुध निर्माणीत २० आॅगस्ट ते १९ सप्टेंबर या एका महिन्याच्या दरम्यान संप पुकारण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनात दिला आहे. पुढे बेमुदत संप होणार असा निर्वाणीचा इशारा देशातील डिफेन्सचे तिन्ही महासंघ बीपीएमएस, आईएनटीयुसी, एआईडीएएफ यांनी दिला. निवेदन देणाºयात बीपीएमस महासंघाचे देवेंद्र लिल्हारे, सीमा घाटे, आयुध निर्माणी कर्मचारी संघाचे रवी कुंडू, नीरज चौधरी, श्याम लांजेवार, कुलदीप खोब्रागडे, खंडाईत, भोंडे, शरद बांते, दिपने, चटप, मंदूरकर, चंदू हटवार, दीपक शिंगाडे, दिनेश ठवकर, रवी तिजारे, इंटक युनियनचे चंद्रशील नागदेवे, रेड युनियनचे निलेश भोंगाडे, डीएमयुचे आतिश दुपारे यांचा निवेदन देणाºयात समावेश आहे.